Krushik Exhibition : नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’ने वेधले लक्ष

बारामती-शारदानगर येथील कृषिक प्रदर्शनातील नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’ने शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
Krushik Exhibition 2023
Krushik Exhibition 2023Agrowon

माळेगाव ः बारामती-शारदानगर येथील कृषिक प्रदर्शनातील (Krushik Exhibition 2023) नावीन्यपूर्ण ‘स्टार्टअप’ने (Agriculture Startup) शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. तसेच, प्रदर्शनातील जवस, एरंडी, बकव्हीट, हळवी, रब्बी हायब्रीड कांदा, करडईच्या नवीन पीक पद्धती पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी राज्यभरातील शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

Krushik Exhibition 2023
Krushik Exhibition : भविष्यातील शेती पाहण्याची शेतकऱ्यांना संधी

‘‘भविष्यातील शेतीसाठी शेतकऱ्यांना नेमके काय हवे आहे, ते ‘कृषिक’मध्ये पाहावयास मिळत आहे. शेतकरी कष्टाळू असतात, पण त्यांना शास्त्रशुद्ध शेती करण्यासाठी अधिकचे ज्ञान कृषिक प्रदर्शनात देण्याचा आमचा प्रयत्न आहे,’’ अशी प्रतिक्रिया अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्‍वस्त सुनंदा पवार दिली.

Krushik Exhibition 2023
Krushik Exhibition 2023 : कृषिक प्रदर्शन पाहण्यास उसळली शेतकऱ्यांची गर्दी

‘‘महाराष्ट्राची सीमा ओलांडून आलो आणि कृषिक प्रदर्शनातील मिळालेले ज्ञान पुन्हा कर्नाटक राज्यातील शेतकऱ्यांसाठी घेऊन चाललो आहे,’’ अशी भावना कर्नाटकचे माजी ऊर्जामंत्री वीरगोंडा पाटील यांनी व्यक्त केली.

‘‘शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअपसाठी निती आयोगाने निवडलेल्या भारतातील एकमेव बारामती कृषी महाविद्यालयाच्या इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरची उभारणी महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बारामती कृषी महाविद्यालय आता शेतीतील नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे केंद्र बनू पाहत आहे. त्याचे उत्तम उदाहरण कृषिक प्रदर्शनातून दिसून आले,’’ असे मत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे (अकोला) कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी व्यक्त केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com