Bhimthadi Jatra : भीमथडी’त आजपासून भरडधान्याचे विविध प्रकार पाहण्याची संधी

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित, शारदा महिला संघ, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने १६ व्या ‘भीमथडी’ची सुरुवात आजपासून (ता.२१) सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे.
Bhimthadi Jatra
Bhimthadi JatraAgrowon

पुणे : अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट (Agriculture Development Trust) बारामती संचलित, शारदा महिला संघ, भीमथडी फाउंडेशन (Bhimthadi Foundation) व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या सयुंक्त विद्यमाने १६ व्या ‘भीमथडी’ची (Bhimthadi Jatra) सुरुवात आजपासून (ता.२१) सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. भीमथडीत भरडधान्यासाठी स्वतंत्र दालन असणार असून, त्यामध्ये भरडधान्याचे शेकडो प्रकार पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

Bhimthadi Jatra
Bhimthadi Jatra : भीमथडी जत्रा २१ डिसेंबरपासून सुरू

भरडधान्य ही आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त असल्याने त्याचा आहारातील वापर हळूहळू वाढत चालला आहे. ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यांसह राळे, भगर, सावा, वरई या धान्यांसह भीमथडीमध्ये या धान्यापासून बनविलेली पिठे, पास्ता, पापड, नूडल्स, रागी, बिस्कीट, ढोकळा, डोसा, इडली, पोहे, लाडू, आंबील, कुकीज, चकली, कुरकुरे, दलिया, थालीपीठ, उपमा, खाकरा, खीर असे विविध प्रकार पुणेकरांना पाहायला मिळणार आहेत.

आजपासून सुरू होणाऱ्या भीमथडीला पुणेकरांनी आवर्जून भेट द्यावी, असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com