Mansion Conservation : प्राचीन वाड्यांचे होणार संवर्धन

प्राचीन वाड्यांमध्ये पर्यटकांना राहण्याच्या आनंदातून ग्रामीण पर्यटनाला चालना मिळेल. त्यासाठी जिल्ह्यातील खासगी प्राचीन वाडे, ऐतिहासिक वाड्यांच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
Mansions Conservation
Mansions Conservation Agrowon

पुणे ः प्राचीन वाड्यांमध्ये (Ancient Mansions) पर्यटकांना (Tourist) राहण्याच्या आनंदातून ग्रामीण पर्यटनाला (Rural Tourism) चालना मिळेल. त्यासाठी जिल्ह्यातील खासगी प्राचीन वाडे, ऐतिहासिक वाड्यांच्या (Historic Mansions Conservation) संवर्धनासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.

यासाठी प्रत्येक गावातील प्राचीन वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या बाबतच्या सूचना जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांनी सर्व पंचायत समित्यांना दिल्या आहेत.

Mansions Conservation
Sustainable Agriculture : शेतीत शाश्‍वती कधी?

दरम्यान, ‘वाडे जतन प्रोत्साहन योजना’ राबविण्याबाबत जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे.

वाडे संवर्धनाबाबत सह्याद्रीच्या वतीने दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्राला ऐतिहासिक वाड्यांच्या वास्तुशैलीचा सांस्कृतिक वारसा लाभला आहे.

मात्र झपाट्याने होणाऱ्या शहरीकरणामुळे अनेक लहान-मोठे प्राचीन खासगी वाडे जमीनदोस्त होऊन वाडा संस्कृती संपुष्टात येत आहे.

Mansions Conservation
Agriculture Warehouse : गोदाम उभारणी नोंदणी प्रक्रियेतील टप्पे

प्राथमिक स्तरावर पुणे जिल्ह्यातील वाड्यांचे सर्वेक्षण जिल्हा परिषद, ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर करून योजना आखणीसाठी नगरविकास, ग्रामविकास, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयाद्वारे समिती स्थापन करावी, अशी मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेने वाड्यांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना सर्व पंचायत समित्यांना दिल्या आहेत.

‘ग्रामीण भागात पर्यटनाची संधी’

‘‘पुणे जिल्ह्याच्या ग्रामिण भागात पर्यटनासाठी प्रचंड संधी आहेत. शेतकऱ्यांना रोजगार निर्मितीसाठी राजस्थानच्या धर्तीवर प्राचीन ऐतिहासिक वाडे संवर्धनातून, त्यांचे ‘होम स्टे’मध्ये रूपांतर करण्याची संकल्पना आहे. यासाठी वाड्यांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पुणे नाशिक आणि मुंबई या सुवर्ण त्रिकोण अंतर्गत महानगरांची लोकसंख्या सुमारे ५ कोटी एवढी आहे.

यामधील १ टक्का लोकसंख्या ‘वीकएण्ड’ला एक-दोन दिवसांसाठी पर्यटनाला बाहेर पडली तरी मोठी आर्थिक उलाढाल ग्रामीण भागात होईल. यासाठी नव्याने हॉटेल्स बांधण्यापेक्षा प्राचीन वाड्यांमध्ये निवास व्यवस्था केल्यास स्थानिकांना मोठा रोजगार निर्मिती होईल. त्यासाठी प्रयत्नशील आहे,’’ असे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com