Marathi Language : मराठीचे प्राचीन पुरावे केंद्र सरकारकडे सादर

उद्योगमंत्र्यांची माहिती; शिलालेख परिसराचे सुशोभीकरण
Marathi Language
Marathi LanguageAgrowon

अलिबाग : मराठी भाषेचे अतिप्राचीन पुरावे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला (Union Ministry of Culture) सादर करण्यात आलेले आहेत. यात अलिबाग तालुक्यातील आक्षी येथील आद्य शिलालेख हा ठोस पुरावा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी सध्याचे राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी म्हटले आहे.

आक्षी शिलालेखाचे येथील समुद्रकिनारी असलेल्या साई मंदिर परिसरात सुयोग्य जागेत प्रस्तापित करणे व परिसर सुशोभिकरण करण्यात आले आहे. या कामांचे उद्‍घाटन सोमवारी (ता. ३१) उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. मराठी भाषेतील आद्य शिलालेख व आणखी एक शिलालेख असे दोन शिलालेख आक्षी गावात रस्त्याच्या कडेला दुर्लक्षित अवस्थेत उभे होते.

Marathi Language
Wheat Sowing : गहू पेरणी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा?

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी शिलालेखाची पाहणी करत त्यांचे जतन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर राज्य सरकारने शिलालेख जतन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

माजी पालकमंत्र्यांना निमंत्रणच नाही

प्रादेशिक पर्यटन विकास योजना; तसेच जिल्हा नियोजन समितीने या कामासाठी २२ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी तत्कालीन पालकमंत्री अदिती तटकरे यांनी विशेष प्रयत्न केले होते.

त्यांच्याच उपस्थितीत या कामाचे १ मे रोजी भूमिपूजन झाले होते. पदावरून पायउतार झाल्यानंतरही अदिती तटकरे यांनी कामाचा पाठपुरावा करत तीन महिन्यांत हे काम पूर्ण करून घेतले. मात्र, आजच्या कार्यक्रमासाठी त्यांनाच आमंत्रण देण्यात आले नव्हते. यामुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा रंगत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com