
Amravati Bagalinga Dam : चिखलदरा तालुक्यातील बागलिंगा येथे जलसंपदा विभागाअंतर्गत (Department Of Water Resources) १६ कोटी रुपये खर्च करून सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवण (Water Storage Capasity) क्षमतेच्या धरणाचे काम चालू सुरू आहे.
मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे व कमकुवत होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप असून कामाच्या गुणवत्तेबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, याच मुद्द्यावर गावकऱ्यांनी या धरणाचे काम बंद पडले. या कामावर काळ्या माती ऐवजी लाल मातीचा वापर होत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात दगड सुद्धा या बांधात वापरल्या जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.
या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी व काम दर्जेदार व्हावे जेणेकरून हे धरण फुटणार नाही आणि या धरणापासून कोणालाही नुकसान होणार नाही, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
धरणाचे काम व्यवस्थित सुरू असून काळ्या मातीचा वापर आम्ही करीत आहोत. काम उत्कृष्ट दर्जाचे होत आहे. आम्ही दिवसाच काम करतो, अशी प्रतिक्रिया जलसंपदा विभागाचे उपअभियंता सोमा इंदुरकर यांनी दिली.
बागलिंगा येथील गावकऱ्यांचा फोन आला होता. त्यामुळे मी धरणावर गेलो होतो. सध्या येथे जे काम होत आहे ते चांगले व्हावे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.