Solapur News : कसगीच्या उत्सवातील पशुबळी प्रथा बंद

शतकभरापूर्वी रेड्याचा बळी देऊन ही प्रथा सुरू करण्यात आल्याची माहिती गावातील वृद्ध माणसे सांगतात.
Solapur News
Solapur NewsAgrowon

उमरगा : महाराष्ट्र-कर्नाटक सिमेवर असलेल्या तालुक्यातील कसगी गावात (kasgi Village) दरवर्षी जानेवारी महिन्यात होणाऱ्या लक्ष्मी मंदिराच्या उत्सवातील (Yatara Utsav) पशुहत्या बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी एकमुखाने घेतला. कसगीतील देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पशुबळी (Animal sacrifice) देण्याची अनिष्ट प्रथा सुरू होती.

शतकभरापूर्वी रेड्याचा बळी देऊन ही प्रथा सुरू करण्यात आल्याची माहिती गावातील वृद्ध माणसे सांगतात.

रेड्याचा बळी देण्यासाठी त्या काळातील उपेक्षित समाजातील व्यक्तीला पुढे करण्यात आले. आणि कालांतराने त्याच कुटुंबातील व्यक्तीची लक्ष्मीच्या पुजारी पदासाठी नेमणूक करण्यात आली.

पुढे रेड्या ऐवजी बोकड, मेंढा अथवा गाभण मेंढीचा बळी देण्याची पद्धत रूढ झाली. आणि गावकऱ्यांनी गावातील एका विशिष्ट समाजाला लक्ष्मीसाठी बळीचा बकरा मोफत पुरविण्याची गळ घातली, त्या बदल्यात गावातील शेळ्या मेंढ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर चारण्याची मुभा देण्यात आल्याची माहिती सांगण्यात येते.

भारत भूमीत उदयास आलेल्या हिंदू, बौद्ध, जैन या कुठल्याही धर्मात पशुबळी सारख्या अघोरी प्रथेस स्थान नसल्याचे चर्चेअंती निष्पन्न झाले.

शिवाय श्री सिद्धेश्‍वर हे गावाचे दैवत असून, त्यांच्या अनुयायांना तर पशुहत्या निषिद्ध असल्याचे मत या बैठकीत मांडण्यात आले.

स्वाध्याय परिवारातील स्वाध्यायी लोकांनी देखील पशुहत्या हा अधर्म असल्याचे मत व्यक्त केले.

Solapur News
Animal care : पशु आहारात कॅल्शिअम का आहे गरजेचे?

लक्ष्मी मंदिराची पुजारी यांनीही पशू हत्येचे दुष्कृत्य करण्याविषयी नापसंती दर्शविली. शिवाय, पशुबळी हा प्रकार अंधश्रद्धा या प्रकारात मोडतो. आणि अंद्धश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार, धर्माच्या नावावर पशुबळी देणे हा दंडनीय गुन्हा ठरतो.

या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम होऊन १८ जानेवारीपासून गावातील सर्व चांगल्या प्रथांचे यापुढे पालन करीत, पशुहत्या प्रथेस मुठमाती देऊन, कसगी गावाने नवा आदर्श घालून दिला.

ही बंदी यापुढेही कायम ठेवण्यासाठी ग्रामस्थांची सकारात्मक भूमिका असली पाहिजे. सरपंच गुरव, विठ्ठलराव जाधव, किसन बाबरे, गंगाधर जगदाळे, श्रीमंत कांबळे, तुकाराम गुरव, कुशिंदर कांबळे, पांडुरंग कांबळे, शिवानंद पत्रावळे आदींनी यासाठी पुढाकार घेतला.

पशुबळी देऊन विधी करण्याची अघोरी प्रथा न पाळण्याचा विवेकी असा निर्णय कसगीकरांनी घेतला आहे, त्यांच्या या कालसुसंगत निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने अभिनंदन निर्णयावर ठाम राहिल्यास एक आदर्श पायंडा इतरांना प्रेरणा देणारा ठरेल.
प्रा. किरण सगर, अंधश्रद्धा निर्मूलन समिती राज्य कार्यकारणी सदस्य

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com