Bee Keeping : केंद्रीय मधमाशीपालन संशोधन, प्रशिक्षण केंद्राचा उद्या वर्धापनदिन

शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा उद्या (ता.०१ नोव्हेंबर) ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे.
Beekeeping
BeekeepingAgrowon

पुणे : शिवाजीनगर येथील केंद्रीय मधमाशीपालन संशोधन व प्रशिक्षण केंद्राचा (Central Beekeeping Research, Training Center) उद्या (ता.०१ नोव्हेंबर) ६० वा वर्धापनदिन साजरा करण्यात येणार आहे. केंद्राचे माजी संचालक डॉ आर. पी फडके यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्राचे माजी वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. के. के क्षीरसागर, उपसंचालक डॉ. बसवराज रमण्णा, माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एम. टी. वाकोडे, माजी उपसंचालक डॉ. डी. जी थॉमस, माजी विकास अधिकारी डॉ. डी. एम वाखले, माजी सहसंचालक के लक्ष्मीराव, सहाय्यक संचालक सुनिल पोकरे आदि उपस्थित राहणार आहे.

Beekeeping
Beekeeping : कृषिकन्यांकडून मधमाशी पालनाबद्दल जनजागृती

केंद्राचे सहाय्यक संचालक सुनिल पोकरे म्हणाले की, ‘‘केंद्रीय मधुमक्षीका संशोधन व प्रशिक्षण संस्था ही आशिया खंडातील एकमेव मधुमक्षिका पालनामध्ये संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था आहे. संस्थेची स्थापना सर्वप्रथम १९५२ साली महाबळेश्वर येथे एका छोट्या मधुमक्षिकापालन संस्थेमध्ये झाली होती. मधमक्षिपालनावर सर्वांगीण अभ्यास करण्यासाठी मुंबई ग्रामोद्योग समितीने सर्वप्रथम संशोधन केंद्र सुरू केले होते.’’

Beekeeping
Honey Scheme : मधकेंद्र योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

महाबळेश्वर येथे मधमाशापालनाच्या विविध क्षेत्रात संशोधन केले. या कामामुळे प्रभावित होऊन, खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे पहिले अध्यक्ष वैकुंठभाई मेहता यांनी सर्व भारतासाठी केंद्रीय मधुमक्षिका संशोधन व प्रशिक्षण संस्था ही अखिल भारतीय स्तरावर काम करणारी एकमेव शिक्षण संस्था निर्माण केली. सर्वप्रथम १ नोहेंबर १९६३ रोजी ही संस्था, पुणे येथील आगरकर संस्था, होमगार्ड बिल्डिंग, शंकर रोड, २४. हातकागद पेपर संस्था येथे विखुरलेल्या अवस्थेत होते. पुढे १ नोहेंबर, १९८४ रोजी शिवाजीनगर, पुणे येथे स्वतंत्र जागेमध्ये स्थानांतरित झाली.

संस्थेमध्ये मधुवनस्पतीशास्त्र, परागशास्त्र, मधमाशीपालनशास्त्र, मधमाशाशास्त्र, जीवरसायनशास्त्र विभाग यासह प्रशिक्षण विभाग, मधविक्री विभाग व सुसज्ज ग्रंथालय आहे. भारतात उष्ण काटीबंधापासून ते शितकटीबांधापर्यंतचे प्रदेश येत असल्याने, प्रत्येक ठिकाणच्या मधमाशा व वनस्पती यावर संशोधन करण्यासाठी राज्य मधमाशापालन विस्तार केंद्र उघडण्यात आलेली आहे. शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेमार्फत मधमाशापालनाच्या शिक्षणाचे कार्यक्रम राबविले जातात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com