‘गोकुळ’ची आजची वार्षिक सभा गाजण्याची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. २९) होणारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) गाजण्याची शक्यता आहे.
Gokul
GokulAgrowon

कोल्हापूर ः गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (ता. २९) होणारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाची (गोकुळ) गाजण्याची शक्यता आहे.

Gokul
Milk : शासकीय दूध संकलन केंद्राकडे उत्पादकांची पाठ

सभेला विरोधकांनीही हजेरी लावून प्रश्‍न विचारण्याची तयारी ठेवली आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनानेही ही सभा गांभीर्याने घेतली आहे. महासैनिक दरबार हॉलमध्ये होणाऱ्या या सभेच्या ठिकाणी वाहन पार्किंगलाही बंदी घातली आहे. या शिवाय हॉलसमोरील रस्त्यावरही वाहन लावता येणार नाही, अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे.

Gokul
Milk : ‘दूधपंढरी’चा गाईचा दूध खरेदी दर ३५ रुपयांवर

कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी ‘गोकुळ’ची सभा होत आहे. त्यात गेल्या वर्षी संघात सत्तांतर झाले आहे. सत्तांतरानंतर संघातील विरोधकांकडून संघाच्या कारभारावर अधूनमधून टीका केली जात आहे. त्यात विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडीक यांनी पत्रकार बैठका घेऊन संघाच्या कारभारावर आरोप केले आहेत. त्याला सत्तारूढ गटाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तरामुळे सभेपूर्वीच राजकारण तापले आहे. आतापर्यंत महाडीक यांच्याकडूनच पत्रकबाजी सुरू होती. अलीकडे त्यात माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील यांनीही उडी घेतली आहे.

सभा गुंडाळणार नाही’

सोमवारी (ता. २९) होणाऱ्या सभेला उपस्थित राहून सत्ताधाऱ्यांना प्रश्‍न विचारण्याचा इशारा विरोधकांकडून दिला जात आहे. तत्पूर्वी सभा गुंडाळली जाणार नाही. सर्व प्रश्‍नांची उत्तरे दिली जातील. सभा संपल्याशिवाय राष्ट्रगीत लावले जाणार नाही, असे संघाचे नेते आमदार सतेज पाटील व आमदार हसन मुश्रीफ यांनी जाहीर केले आहे. या पूर्वीच्या सभांचा इतिहास पाहता या सभेतही प्रश्‍नोत्तरावरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com