Koyana Dam
Koyana DamAgrowon

Koyna Irrigation : जलमापक यंत्र बसविण्याचे कोयना सिंचन विभागाचे आवाहन

कोयना सिंचन विभाग कोयनानगर कार्यक्षेत्रातील खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांनी तसेच सहकारी पाणीपुरवठा योजनांनी स्वखर्चाने स्रोतांच्या जागी बंदिस्त वितरण नलिकेवर जलमापक यंत्र बसविणे अनिवार्य आहे.

सातारा : कोयना सिंचन विभाग (Koyna Irrigation Department) कोयनानगर कार्यक्षेत्रातील खासगी उपसा सिंचन योजनेच्या (Irrigation Scheme) लाभार्थ्यांनी तसेच सहकारी पाणीपुरवठा योजनांनी स्वखर्चाने स्रोतांच्या जागी बंदिस्त वितरण नलिकेवर जलमापक यंत्र (Water Meter) बसविणे अनिवार्य आहे. त्यानुसार प्राधिकरणाने पाणी वापराचे दर पुढीलप्रमाणे निश्चित केले आहे.

Koyana Dam
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’चे पाणी शेवटच्या शेतापर्यंत पोहोचविणार

वहन व्ययासह नियंत्रित पाणीपुरवठा (धरणाखालील नदी/को. प. बंधारा) पाणीवापराचे दर (पैसे प्रति १००० लिटर) खरीप ५.००, रब्बी १०.००, उन्हाळ १५.०० असे एकूण ३०.०० प्राधिकरणाच्या आदेशापासून एक वर्षाच्या संक्रमण कालावधीपर्यंत (दिनांक २८ मार्च २०२३ पर्यंत) खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांनी तसेच सहकारी पाणीपुरवठा योजनांनी जलमापक यंत्र न बसविणे, पाणी वापराचे प्रति हेक्टर दर खालील प्रमाणे क्षेत्राधारीत आकारण्यात येतील.

२०२१-२२ साठी अन्नधान्य व इतर पिकांसाठी खरीप ३९, रब्बी ५९, उन्हाळ ११७ असे एकूण २१५ तर ऊस व केळी खरीप १८७, रब्बी ३७५, उन्हाळ ५६० असे एकूण ११२२. २०२२-२३ साठी अन्नधान्य व इतर पिकांसाठी खरीप ६००, रब्बी १२००, उन्हाळ १८०० असे एकूण ३६०० तर ऊस व केळी खरीप १८९०, रब्बी ३७८०, उन्हाळ ५६७० असे एकूण ११३४०.

Koyana Dam
Irrigation Subsidy : तुषार, ठिबक अनुदानाचे पावणेसात कोटी रुपये थकले

खासगी उपसा सिंचन येाजनेच्या लाभार्थ्यांनी तसेच सहकारी पाणीपुरवठा योजनांनी उपरोक्त संक्रमण कालावधीत जलमापक यंत्र न बसविल्यास/ जलमापक यंत्र बंद पडल्यास/जलमापक यंत्रामध्ये फेरफार केल्याचे निदर्शनास आल्यास उपरोक्त क्षेत्राधारित दराचे दोन पट दराने आकारणी करण्यात येईल.

खासगी उपसा सिंचन योजनेच्या लाभार्थ्यांनी जलमापक यंत्र न बसविल्यास, मागील वर्षांच्या तुलनेत चालू वर्षापासून त्यांच्या पाणीपट्टी आकारणीमध्ये लक्षणीय वाढ करण्यात येणार आहे.

तरी सर्व सबंधितांना आवाहन करण्यात येते, की त्यांनी त्यांच्या योजनेवर त्वरित जलमापक यंत्र बसवावे अन्यथा त्यांचे वाढीव पाणीपट्टी बाबतची कोणतीही तक्रार स्वीकारली जाणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे आवाहनही कोयना सिंचन विभाग करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com