Mumbai Market Committee : मुंबई बाजारात सफरचंदाचे वर्चस्व

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारावर सफरचंदाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. प्रतिदिन ७०० ते एक हजार टनाची आवक होत आहे.
Mumbai Market Committee
Mumbai Market CommitteeAgrowon

वाशी : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Mumbai Market Committee) फळ बाजारावर सफरचंदाचे वर्चस्व निर्माण झाले आहे. प्रतिदिन ७०० ते एक हजार टनाची आवक होत आहे. संत्री आणि मोसंबीची आवकही वाढली असून ग्राहकांकडून सीताफळालाही पसंती मिळू लागली आहे.

विदेशातूनही आयात

इराण, टर्की आणि न्यूझीलंडमधून सफरचंदाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. इराणी सफरचंद ८० ते १०० रुपये; तर काश्मीर सफरचंदांची ६० ते ९० रुपये किलोने घाऊक विक्री होत आहे.

डाळिंबाचा भावही वधारला

एपीएमसी मार्केटमध्ये डाळिंबही भाव खात आहेत. होलसेल मार्केटमध्ये जवळपास १२० ते १८० रुपये दराने विकले जात आहेत.

स्ट्राॅबेरीला मागणी

महाबळेश्वर व नाशिकमधून स्ट्रॉबेरीची आवक वाढू लागली आहे. प्रतिदिन जवळपास सहा टन आवक होत असून होलसेल मार्केटमध्ये १२० ते २०० रुपये किलोचा दर मिळत आहे.

द्राक्ष आवक सुरू

एपीएमसी मार्केटमध्ये नाशिकमधून द्राक्षाची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमधील काळी द्राक्ष देखील बाजारात उपलब्ध होत आहेत. काळी द्राक्ष प्रतिकिलो १५० ते १८०; तर पिवळी द्राक्ष ६० ते ७० रुपयांनी विकली जात आहेत.

Mumbai Market Committee
Mumbai - Mandva : मुंबई-मांडवा प्रवास ४० मिनिटांत

इराणी सफरचंद

फळ मार्केटमध्ये प्रतिदिन १,५०० ते १,८०० टन फळांची आवक होऊ लागली आहे. सफरचंद, संत्री, मोसंबी, पपई, कलिंगड यांची नियमित १०० टनापेक्षा जास्त आवक होत आहे. हिमाचल प्रदेशमधील सफरचंदांचा हंगाम सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये सफरचंदाला ६० ते ९० रुपये दर मिळत आहे. किरकोळ मार्केटमध्ये १०० ते २०० रुपये किलो दराने सफरचंद विकले जात आहे. घाऊक बाजारात इराणी सफरचंदामुळे काश्मीर आणि किन्नर सफरचंदाच्या दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे.

फळ बाजारातील आयात

फळ आवक (टनामध्ये) दर रुपयांत (किलो)

डाळिंब ६६ १२० ते १८०

द्राक्ष १४ ७० ते ८०

कलिंगड ११५ १६ ते ३०

मोसंबी १२९ २५ ते ५०

सफरचंद ७३९ ६० ते ९०

संत्री १९८ २६ ते ५०

सीताफळ ९८ ४० ते ८०

स्ट्रॉबेरी ६ १२० ते २००

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com