Agriculture Electricity : बिबट्याप्रवण क्षेत्रात दिवसा वीज देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बिबट हल्ल्याच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली.
Agricultural pump electricity
Agricultural pump electricityAgrowon

Agriculture Electricity पुणे : आंबेगाव-शिरूर तालुक्यांतील विविध पदाधिकाऱ्यांसह माजी सभापती देवदत्त निकम यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन बिबट्याचा (Leopard Terror) वाढता वावर व मानवी हल्ले (Leopard Attack) यासंदर्भात चर्चा केली.

शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर या चारही तालुक्यांत शेतकऱ्यांना दिवसा वीज (Electricity) देण्यासंदर्भात निवेदन दिले. या निवेदनासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले.

बिबट हल्ल्याच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. या वेळी अनिकेत कुऱ्हाडे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र दाभाडे, जांबूतचे सरपंच दत्तात्रय जोरी, उपसरपंच विकास वरे, शरद बोंबे, नाथा जोरी आदी उपस्थित होते.

Agricultural pump electricity
Junnar Leopard News: जुन्नरला नागरी वस्तीतील पाचवा बिबट्या जेरबंद

उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यांत मागील काही दिवसांपासून बिबट्याने थैमान घातलेले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून, कित्येक जण हल्ल्यात गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पशुधन धोक्यात आले असल्याचे दिसून येत आहे.

मागील सहा महिन्यांत शिरूर तालुक्यातील जांबूत आणि पिंपरखेड परिसरात चार जण बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले आहेत. या चारही तालुक्यांत ऊसशेतीचे प्रमाण अधिक असल्याने बिबट्यांचे वास्तव्य वाढलेले आहे.

दिवसा वीज न दिल्यास आंदोलनाचा इशारा

शेतात कामे करताना दिवसा बिबट्यांचे दर्शन होत असून, शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून जावे लागत असल्याने शेतकरीवर्ग भयभीत झाला आहे.

घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेता शेतीसाठी दिवसा वीज मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात आहे. घटनांचे गांभीर्य वनविभागाने याआधी महावितरणला प्रस्ताव सादर करून निदर्शनास आणून दिलेले आहे.

तरीही कोणताही ठोस निर्णय महावितरण व शासनाकडून घेतला नसल्याने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा देवदत्त निकम यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com