गाळप परवान्यासाठी २९ कारखान्यांकडून अर्ज

नांदेड विभागातील स्थिती; दोन खासगी कारखान्यांची भर
Crushing Season
Crushing SeasonAgrowon

नांदेड : नांदेड प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाकडे गाळप हंगाम (Crushing Season) २०२२-२३ साठी २८ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज सादर केले आहेत. यात २० खासगी तर नऊ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. यंदा परभणी आणि लातूर जिल्ह्यात दोन खासगी कारखान्यांची भर पडल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालकक (साखर) सचिन रावल (Sachin Raval) यांनी दिली.

Crushing Season
सांगली जिल्ह्यात तेरा साखर कारखान्यांकडून ४२ लाख उसाचे गाळप

नांदेड विभागात नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड विभागात मागील वर्षी २७ साखर कारखाने सुरू झाले होते. यात १८ खासगी तर ९ सहकारी कारखान्यांचा समावेश होता. चालू हंगाम २०२२-२३ या वर्षाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. यासाठी विभागातील साखर कारखान्यांनी गाळप हंगामासाठी राज्याच्या साखर आयुक्तांकडे गाळप परवान्यासाठी ऑनलाइन अर्ज सादर केले आहेत. यात १९ खासगी, तर नऊ सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे.

Crushing Season
गाळप परवान्यासाठी आता 'एफआरपी'ची अट

गाळपासाठी अर्ज केलेले जिल्हानिहाय कारखाने
  परभणी जिल्हा : रेणका शुगर देवनंद्रा, श्री लक्ष्मी नृसिंह शुगर अमडापूर, योगेश्‍वरी शुगर लिंबा, गंगाखेड शुगर माकणी, ट्वेंटीवन शुगर सायखेडा, बळीराजा कानडखेड. श्री तुळजा भवानी, जिंतूर.
  हिंगोली जिल्हा : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना डोंगरकडा, पूर्णा सहकारी साखर कारखाना वसमत, शिऊर साखर कारखाना वाकोडी. कपीश्‍वर शुगर अँड केमिकल लिमिटेड, जवळा बाजार. टोकाई सहकारी साखर कारखाना कुरुंदा.
  नांदेड जिल्हा : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना देगाव, सुभाष शुगर हडसणी, शिवाजी सर्व्हिस स्टेशन बाऱ्हाळी, कुंटूरकर शुगर कुंटूर, व्यंकटेश्‍वरा ग्रो शुगर शिवणी, एमव्हीके ॲग्रो फूड प्रॉडक्ट, वाघलवाडा.
  लातूर जिल्हा : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना चिंलोलीराव वाडी, विलास सहकारी साखर कारखाना निवळी, विलास सहकारी साखर कारखाना तोंडार, रेणा सहकारी साखर कारखाना निवडा, सिद्धी शुगर उजना, जागृती शुगर तळेगाव, ट्वेटींवन शुगर्स माळवटी, पन्नगेश्‍वर शुगर मिल्स पानगाव (ता. रेणापूर), संत शिरोमणी मारोती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकुड (ता. ओसा) व श्री साईबाबा शुगर लि. शिवणी (ता. ओसा), निलंगेकर शुगर लातूर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com