Pune APMC Election : पुणे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये अनेक इच्छुकांचे अर्ज बाद

पुणे जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसह पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी छाननी झाल्यानंतर अनेक उमेदवारी अर्ज वैध झाल्याने आता सर्वच बाजार समित्यांमध्ये चुरस वाढली आहे.
Pune APMC Election
Pune APMC ElectionAgrowon

Pune APMC Election : पुणे जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांसह पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी (APMC Eelction) छाननी झाल्यानंतर अनेक उमेदवारी अर्ज वैध झाल्याने आता सर्वच बाजार समित्यांमध्ये चुरस वाढली आहे. यामुळे आता अर्ज माघारीच्या २० एप्रिलच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांचे टेंशन वाढणार आहे. (APMC Election Update)

अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटप झाल्यावर सर्व लढती स्पष्ट होऊन, खऱ्या अर्थाने रणधुमाळी सुरू होणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्वात मोठी असलेल्या जुन्नर बाजार समितीच्या माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. तर एका उमेदवाराचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Pune APMC Election
Nashik Apmc Election Update : ‘त्या’ सहा विविध कार्यकारी संस्थांना उच्च न्यायालय पात्र ठरवेल

पुणे (हवेली) बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी तब्बल ३०१ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये १६ उमेदवारांचे १८ अर्ज बाद करण्यात आले, तर ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज भरले होते त्यांचा एकच अर्ज मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ३०१ अर्जांपैकी १९५ अर्ज वैध ठरले आहेत.

इंदापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी १५६ अर्जापैकी १० अर्ज छाननीमध्ये बाद झाले असून १४६ अर्ज वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जे. पी. गावडे यांनी दिली.

नीरा (ता. पुरंदर) बाजार समितीसाठी तीन अर्ज बाद झाल्यानंतर १४३ उमेदवार रिंगणात असून, यामध्ये मतदारयादीत नाव नसताना देखील शेतकरी गटातून ३६ शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

दौंड बाजार समितीमध्ये २१७ पैकी ६ अर्ज बाद झाल्यानंतर २११ अर्ज वैध ठरले आहेत. तर भोर बाजार समितीमध्ये हमाल तोलणार गटातील विनोद खुटवड यांची एक जागा बिनविरोध झाल्याने आता १७ जागांवर निवडणूक होणार आहे. यासाठी ७१ अर्ज वैध ठरले आहेत. मंचर बाजार समितीसाठी २७ अर्ज बाद होऊन, १५५ अर्ज वैध ठरले आहेत.

Pune APMC Election
Jalgaon Apmc Election : जो निधी आणेल, त्यालाच पॅनेलमध्ये स्थान

जुन्नरमध्ये माजी सभापतींचा अर्ज बाद

जुन्नर बाजार समितीमध्ये २५८ उमेदवारी अर्जांपैकी १७८ अर्ज वैध झाले आहेत. तर ८० अर्ज बाद झाले आहेत. बाद अर्जामध्ये माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा समावेश आहे.

बाजार समितीचे विद्यमान सभापती संजय काळे आणि लेंडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असून, एकमेकांविरोधात आहेत. लेंडे यांच्या सभापतिपदाच्या काळात मुरूम घोटाळा झाला होता. या घोटाळ्यात दोषी ठरल्याने त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या मुद्द्यावर काळे यांनी लेंडे यांच्या अर्जावर आक्षेप घेतला होता. निवडणूक निर्णय अधिकारी एच. एस. कांबळे यांच्याकडे सुनावणी झाल्यानंतर कांबळे यांनी लेंडे यांचा अर्ज बाद केला.

जुन्नरला उमेदवाराचा मृत्यू

जुन्नर बाजार समिती निवडणुकीत बेल्हे गावातील किशोर तांबे यांनी सोसायटी गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती. त्यांचा मृतदेह विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस याबाबतचा तपास करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com