Indian Agriculture : राज्यातंर्गत शेतकरी प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी अर्ज करा

परतीचा पाऊस पिकांचे नासधूस करून गेला. ऐन सुगीच्या दिवसात प्रकोप वाढत गेल्याने हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झाला.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

बुलडाणा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२२-२३ (Integrated Horticulture Development Mission 2022 - 23) मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना राज्यांतर्गत प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रशिक्षण दौऱ्याचे आयोजन केले जाणार आहे. मेहकर उपविभागांतर्गत मेहकर, लोणार, सिंदखेडराजा व देऊळराजा तालुक्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन उपविभागीय कृष अधिकारी ए. के. मिसाळ (A.K. Mial) यांनी केले आहे.

Indian Agriculture
Crop Damage Survey : साहेब, पंचनाम्यासाठी पीक पाण्यात ठेऊ का ?

फलोत्पादन तसेच कृषी क्षेत्राशी निगडीत काम करणाऱ्यां संशोधन संस्था जसे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, पुणे, अहमदनगर, नाशिक व सोलापूर या जिल्ह्यामध्ये भारतीय अनुसंधान परिषद (ICAR) अद्यावत कृषी विज्ञान केंद्र तसेच कृषी विद्यापिठे फलोत्पादन पिकाबाबत कार्यरत आहेत.

तसेच फलोत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रात काम करणारे शेतकरी, प्रक्रिया केंद्र या ठिकाणी भेट देऊन प्रत्यक्ष माहिती घेण्यासाठी अनुदानावर ६० शेतकरी प्रशिक्षणार्थीचे पाच दिवशीय शेतकरी अभ्यास दौरा व प्रक्षेत्र प्रशिक्षणाचे नियोजन मेहकर उपविभागीय कृषी अधिकारी यांच्यामार्फत आयोजित करण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

सदर प्रक्षेत्र प्रशिक्षण दौऱ्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी फळबाग लागवड / कांदाचाळ / संरक्षित शेती/प्राथमिक प्रक्रिया आदीचा लाभ घेतलेला आहे किंवा लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांना प्रक्षेत्र प्रशिक्षण अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करता येईल. शेतकऱ्यांनी अर्ज संबंधित गावच्या कृषी सहाय्यकामार्फत किंवा स्वतः तालुका कृषी धिकारी कार्यालयास संपूर्ण माहितीसह १५ नोव्हेबरपर्यंत सादर करावेत, असे आवाहन ए. के. मिसाळ यांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com