Agriculture Department : शिवारातले कृषी कर्मचारी परीक्षा केंद्रात नेमणुकीस

कृषी विभागाचे कर्मचारी आता शेतकऱ्यांना भेटण्याचे सोडून विद्यार्थ्यांची कॉपी पकडण्यात मग्न झाले आहेत.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Agriculture Department News कोल्हापूर : कृषी विभागाचे (Agriculture Department) कर्मचारी आता शेतकऱ्यांना भेटण्याचे सोडून विद्यार्थ्यांची कॉपी (HSC Exam) पकडण्यात मग्न झाले आहेत. शिक्षण विभागाने (Education Department) बैठे व भरारी पथकासाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेतली आहे.

तहसीलदारांद्वारे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना संबंधित परीक्षा केंद्रावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२१ एप्रिल ते २१ मार्चअखेर तब्बल महिनाभर ‘कृषी’च्या कर्मचाऱ्यांना हे काम करावे लागेल. याशिवाय महसूल विभागातले अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.

कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना अन्य कामे लागल्याने योजनांची वेळेत पूर्तता करण्याचे मोठे आव्हान कृषी विभागाकडे आहे.

दहावी व बारावी परीक्षांच्या कॉपीमुक्त अभियानासाठी कृषी विभागाचे कर्मचारी जुंपले जात आहेत. सध्या मार्चअखेर जवळ येत असल्याने ‘कृषी’च्या विविध योजनांची कामे प्रलंबित आहेत.

या कामात कर्मचारी व्यस्त असताना अचानक सुमारे महिनाभर चालणाऱ्या परीक्षांसाठी या कर्मचाऱ्यांना घेण्यात आल्याने कृषी विभागाची कामे ठप्प होण्याची शक्यता आहे.

Agriculture Department
PM Kisan : अद्याप ८३ हजार पात्र कुटुंबे ई-केवायसीपासून दूर

परीक्षा केंद्रावर परीक्षा घेणे तसेच ज्या भागात भरारी पथके नियुक्त केली आहेत, त्या भागातील परीक्षा केंद्रावर जाऊन भेटी देणे यांसारखी कामे आता कृषी कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत.

शिक्षण विभागात मोठ्या संख्येने शिक्षक असताना या कामासाठी कृषी विभागाला जुंपण्यात आल्याने कृषी कर्मचाऱ्यांतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.

Agriculture Department
PM Kisan : अपात्र लाभार्थ्यांकडून ‘पीएम किसान’ निधीची वसुली सुरू

शैक्षणिक आणि कृषी विभागाचे कामकाज पूर्णपणे वेगळे असताना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यावर हे कामकाज लादण्यात आल्याची भावना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांची आहे.

अगदी परीक्षेच्या दोन दिवस अगोदरच कृषी कर्मचाऱ्यांना परीक्षेविषयी तातडीचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच तातडीने संबंधित परीक्षा केंद्रावर रुजू होण्यास सांगण्यात आले. अचानक आलेल्या या जबाबदारीमुळे कृषी विभागाचे सर्व कामकाज ठप्प होण्याची शक्यता आहे.

कृषी विभागात नाराजी

मार्चअखेरमुळे अनेक कर्मचारी कृषी योजनांची पूर्तता करण्यात गुंतले आहेत. योजनांच्या पूर्ततेसाठी अनेक अडचणी असतानाच आता काही कालावधीसाठी संपूर्ण जबाबदारी बदलण्यात आल्याने कृषी विभागातून नाराजीचा सूर उमटत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com