
कोल्हापूर : शेतकरी सहकारी संघावर (Shetkari Sahakari Sangh) चौदा महिन्यांपासून असणारे प्रशासकीय मंडळ बरखास्त करून त्रिसदस्यीय अशासकीय मंडळाची नियुक्ती केली आहे. संघाचे माजी संचालक सुरेश देसाई (म्हसवे, ता. भुदरगड) अध्यक्ष तर माजी कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते (यळगूड, ता. हातकंणगले) आणि जयवंत पाटील (कुरुकली, ता. कागल) सदस्य म्हणून काम पाहतील.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णय रद्द करून नव्या नियुक्तीचा सपाटा शिंदे-फडणवीस सरकारने लावला आहे. त्यातून शेतकरी संघावरील प्रशासकीय मंडळ रद्द करून अशासकीय मंडळ नियुक्त करण्याचे आदेश काढले आहेत. यामध्ये आमदार प्रकाश आबिटकर यांच्या गटाचे सुरेश देसाई अध्यक्ष, तर मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अजितसिंह मोहिते, तसेच खासदार संजय मंडलिक यांच्याकडून जयवंत पाटील यांना संधी दिली आहे.
शेतकरी सहकारी संघातील सदस्य संख्या झाल्यामुळे १४ जुलै २०२१ पासून प्रशासकीय मंडळ कार्यरत झाले होते. जुलै २०२२ ला प्रशासकीय मंडळाची मुदत संपली होती. त्यामुळे संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ३१ ऑक्टोबर २०२२ या तारखेअखेर असणाऱ्या मतदारांची प्रारूप यादी तयार करण्याचे काम करण्याचे आदेश काढले होते. त्यानुसार संस्था प्रतिनिधींचे ठराव मागविण्यात आले होते. दरम्यान, ही प्रक्रिया सुरूच राहणार आहे. चार महिन्यांत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणार असून, तेवढाच कालावधी अशासकीय संचालक मंडळाला मिळणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.