Flood : पूरबाधित गावांमध्ये समन्वयासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती

जून ते सप्टेंबर कालावधीत मुसळधार पाऊस अथवा अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
Flood
FloodAgrowon

पुणे : जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा (Heavy Rain Forecast) देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात व पूरस्थितीने बाधित (Flood Affected Village) गावांमध्ये समन्वय साधण्यासाठी जिल्हा परिषदेने अतिवृष्टी तालुक्यांसाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (Ayush Prasad) यांनी ही माहिती दिली. जून ते सप्टेंबर कालावधीत मुसळधार पाऊस अथवा अतिवृष्टी होण्याची शक्यता असते. त्याचप्रमाणे भारतीय हवामान विभागाने येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अतिवृष्टी अथवा पूरस्थिती निर्माण झाल्यास काय उपाययोजना करता येतील, त्यासाठी जिल्हा परिषदेने पावले उचलले आहे.

Flood
पूर, भूस्खलनामुळे आसाममध्ये १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पूरस्थितीमुळे अनेक गावे बाधित होतात. अशा प्रसंगी संबंधित गावात समन्वय साधणे कठीण आहे. अशा परिस्थितीत अतिवृष्टी अथवा पूरबाधित गावांमध्ये समन्वय साधणे ही महत्त्वाची बाब आहे. जेणेकरून प्रशासनाकडून सर्व सुविधा उपलब्ध करून शक्य होईल. त्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सचिन घाडगे यांची, तर भोर आणि वेल्हा तालुक्यांसाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, मावळ आणि मुळशी तालुक्यांसाठी मिलिंद टोणपे या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. या अधिकाऱ्यांनी तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांची समन्वय साधून पूरस्थिती आणि बाधित लोकसंख्या, वैयक्तिक व शासकीय मालमत्तांची हानी झालेल्या नुकसानीबाबत माहिती संकलन व संनियत्रणाचे कामकाज करावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com