Seed Production : ‘ग्रामबीजोत्पादन’साठी साडेसहा कोटींच्या वितरणास मान्यता

तांत्रिक कारणामुळे केंद्र सरकारच्या हिश्‍शाची रक्कम वितरित होऊ शकली नव्हती.
Seed Production
Seed ProductionAgrowon

Mumbai News शेतकऱ्यांना उच्च प्रतीची बियाणे (High Quality Seed) उपलब्ध व्हावीत, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या कृषी उन्नती योजनेअंतर्गत बियाणे व लागवड साहित्य ग्रामबीजोत्पादन (Grambijotpadan) योजनेच्या अंमलबजावणीसाठी ६.४८ कोटी रुपये वितरणास मान्यता देण्यात आली आहे.

Seed Production
Soybean Seed : वाशीम जिल्ह्यात यंदा मुबलक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे

२०२२-२३ या वर्षासाठी केंद्र सरकारच्या हिश्‍शापोटी ६ कोटी ४८ लाख ८० हजार आणि राज्य सरकारच्या ४० टक्के हिश्‍शापोटी ४ कोटी ३२ लाख ५३ हजार रुपये अशी १० कोटी ८१ लाख ३३ हजार रुपयांची तरतूद केली होती.

Seed Production
Fertilizer, Seed Supply : बियाणे, खत उपलब्धतेसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

यापैकी राज्य सरकारच्या हिश्‍शाची ४ कोटी ३२ लाख ५३ हजार रुपयांची रक्कम वितरित झाली आहे. दरम्यान, तांत्रिक कारणामुळे केंद्र सरकारच्या हिश्‍शाची रक्कम वितरित होऊ शकली नव्हती.

त्यामुळे हा निधी २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी वितरित करण्याची मागणी कृषी आयुक्तांनी पत्राद्वारे केली होती. या मागणीस वित्त विभागाने मान्यता दिल्याने ६ कोटी ४८ लाख ८० हजार रुपये वितरित करण्यात येणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com