Agriculture Research : जाधववाडी संशोधन केंद्राच्या दोन तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये ५० व्या कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा समारोप नुकताच झाला.
Agriculture Reserach
Agriculture ReserachAgrowon

पुणे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामध्ये (BSKKV) ५० व्या कृषी संशोधन (Agriculture Research) आणि विकास समितीच्या बैठकीचा समारोप नुकताच झाला.

या बैठकीत जाधववाडी येथील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू फळपिकांमध्ये सासवड येथील अंजीर व सीताफळ संशोधन प्रकल्पांच्या अंजीर व सीताफळातील अन्नद्रव्य व्यवस्थापनाबाबत (Custard Apple Nutrient Management) संशोधित झालेल्या दोन तंत्रज्ञानविषयक शिफारशींवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

त्यांची अंमलबजावणी शेतकऱ्यांनी करावी, असे आवाहन आयोजित बैठकीत करण्यात आले.

Agriculture Reserach
Abdul Sattar : सत्तारांवर पुन्हा आरोप

संशोधनाकरिता गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे यांचे मार्गदर्शन मिळाले. तर उद्यानविद्यावेत्ता डॉ. गणपत इदाते, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. सुनील लोहाटे, उद्यानविद्यावेत्ता डॉ. प्रदीप दळवे, वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे, डॉ. देविदास काकडे, मृदा शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद जगताप, वरिष्ठ संशोधन सहायक सुनील नाळे, नितीश घोडके व संदीप लिंभोरे यांचे योगदान लाभले.

संशोधन केंद्राद्वारे यापूर्वी अंजिराची ‘फुले राजेवाडी’ व सीताफळाची ‘फुले पुरंदर’ या जाती प्रसारित करण्यात आल्या आहेत. तसेच केंद्रातील शास्त्रज्ञांनी नुकत्याच लिहिलेल्या अंजीर व सीताफळ लागवड तंत्रज्ञान या पुस्तिकांचे प्रकाशन या बैठकीत करण्यात आले.

Agriculture Reserach
Abdul Sattar : सत्तार यांना उपमुख्यमंत्र्यांची क्लीन चीट

अंजीर पिकांच्या शिफारशीमध्ये महाराष्ट्रातील अंजीर लागवड क्षेत्रात हलक्या जमिनीत अंजिराचे सांख्यिकिदृष्ट्या अधिक उत्पादन आणि निव्वळ आर्थिक फायद्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडास बहार धरताना ५० किलो शेणखत अधिक ११२५:३२५:४१५ ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश प्रति झाड (५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहर धरताना व उर्वरित ५० टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने) देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

सीताफळ शिफारशीमध्ये महाराष्ट्रातील सीताफळ लागवड क्षेत्रात मध्यम खोल जमिनीत या फळाचे सांख्यिकीदृष्ट्या अधिक उत्पादन, अधिक फायदा आणि जमिनीची सुपीकता टिकविण्यासाठी पूर्ण वाढ झालेल्या झाडास २५०:१२५:१२५ ग्रॅम नत्र : स्फुरद : पालाश अधिक ६ किलो गांडूळ खत प्रति झाड (५० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश बहार धरताना व उर्वरित ५० टक्के नत्र बहर धरल्यानंतर एक महिन्याने) देण्याची शिफारस करण्यात येत आहे.

शिफारशीचा अवलंब केल्यास राज्यातील अंजीर व सीताफळ उत्पादक शेतकऱ्यांना अन्नद्रव्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करून जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी व उत्पादनात अधिकाधिक वाढ होण्यास मदत होईल.

- डॉ. प्रदीप दळवे, उद्यानविद्यावेत्ता,

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प, गणेशखिंड, पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com