उसाच्या वजनात अंदाजे ३० ते ३५ टक्के घट

नगर जिल्ह्यात उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
उसाच्या वजनात अंदाजे ३० ते ३५ टक्के घट
sugarcaneagrowon

नगर ः नगर जिल्ह्यासह यंदा राज्यातील अनेक भागात जास्तीच्या उपलब्ध उसाचे परिणाम ऊस उत्पादकांना भोगावे लागले आहेत. एकट्या नगर जिल्ह्याचा विचार केला, तर लवकर उसाची तोड झाली नाही. ऊस तुटण्याच्या आशेने दोन महिने पाणी दिले नाही. गतवर्षीच्या पावसाने उसात पाणी साठले. त्यामुळे तुरे आले अशा अनेक कारणाने नेहमीच्या तुलनेत ३० ते ३५ टक्के वजनात घट झाली. त्यातून नगर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसावे लागल्याचा जाणकारांचा अंदाज आहे. हे नुकसान साखर कारखान्याकडे नोंदणी असलेल्या उसाचे असले तरी नोंदणी नसलेल्या उसाची तर प्रशासकीय दरबारी नोंदही नसल्याची स्थिती आहे.

ऊस उत्पादकांचा आणि साखर कारखान्यांचा(sugar factories) जिल्हा म्हणून नगर जिल्ह्याची ओळख, मात्र यंदा झालेले हाल पाहता ऊस उत्पादक हतबल आहेत. जिल्ह्यात हेक्टरी ८५ टन उसाचे उत्पादन निघेल, असे गृहीत धरून प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने गाळप हंगामाचे नियोजन केले होते. गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर सुरवातीच्या महिनाभरानंतर लगेचच जास्तीच्या उसाचा प्रश्‍न चर्चिला जाऊ लागला. नगर व नाशिक जिल्ह्यांत सुरुवातीला १ लाख ४७ हेक्टरवर ऊस उपलब्ध असल्याचे सांगितले जाऊ लागले. त्यात मात्र वाढ होत गेली. आतापर्यंत सुमारे २ लाख ४० हजार हेक्टरवरील ऊस(sugar Cane )तोडला गेला. तरी अजूनही ऊस शिल्लक आहे.
गेल्या वर्षीचा जास्तीचा पाऊस, ऊसतोडणीच्या आशेने तोडलेले पाणी, तोडणी कालावधी संपूनही चार ते पाच महिन्यांचा झालेला वाढीव कालावधी यामुळे उसाच्या वजनात हेक्टरी ३० टनांपर्यंत घट झाली. जिल्ह्याचा विचार करता सुमारे ४० लाख टनांपेक्षा अधिक उसाचे वजन घटल्याचा अंदाज आहे.

sugarcane
ऊसगाळप अनुदान हे लबाडा घरचे आवतन

यंदा जिल्ह्यात कृषी विभाग, साखर कारखाने आणि प्रादेशिक (साखर) सहसंचालक कार्यालयात समन्वय नसल्याचेच पाहायला मिळाले. गाळप हंगाम सुरू झाला त्या वेळी नाशिक विभागात १ लाख ४७ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध असेल आणि १ कोटी ६० लाखापर्यंत गाळप होईल, असा अंदाज व्यक्त केला. मात्र उसाच्या क्षेत्रात टप्प्याने वाढ होत गेली. अलीकडे झालेल्या बैठकीत सव्वा दोन लाख हेक्टरवरील उसाचे गाळप झाल्याचे सांगितले गेले. प्रशासन, कृषी विभाग आणि साखर कारखान्यांनी उपलब्ध उसाची आकडेवारी लपविली असल्याचा आरोप शेतकरी नेते करीत आहेत. त्यावर मात्र अधिकारी काहीही बोलत नाहीत.
------------
डोळ्यादेखत राखरांगोळी
नगर जिल्ह्यात साखर कारखाने, प्रशासन उसाबाबत अलबेल असल्याचे दाखवत असले तरी उत्पादकांत कारखानदारांबाबत मोठी खदखद आहे. जळालेला ऊस तोडणीला प्राधान्य असल्याने आणि उसाला तोड येत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी ऊस स्वतः जाळला. डोळ्यादेखत उसाची राखरांगोळी झाल्याची पाहावी लागली, असे एका शेतकऱ्याने सांगितले. उसाच्या प्रश्‍नाचा नेत्यांनाही पुढील काळात फटका सोसावा लागेल, असेही शेतकरी बोलत आहेत.

वेळेत ऊस तुटला नाही. मोठ्या प्रमाणात वजनात घट झाली. त्याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्याची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे.

- अनिल औताडे, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, नगर

वेळेवर ऊस तोडणी मिळत नाही. उसाला तुरे आले आहेत. तळ हाताप्रमाणे जपलेल्या उसाची आणि शेतकऱ्यांच्या स्वप्नाची राखरांगोळी होत आहे. उसाचे एकेरी उत्पन्न २५ टनांपर्यंत आले आहे. यात परिस्थितीत शेतकरी कसा जगेल?

गुरुनाथ माळवदे, ऊस उत्पादक शेतकरी, ढोरसडे, ता. शेवगाव, जि. नगर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com