Agriculture Electricity : पुणे विभागात कृषिपंपाची बारा हजार कोटींची थकबाकी

पुणे विभागातील १२ लाख ५४ हजार कृषिपंप वीज ग्राहकांची डिसेंबरअखेर थकबाकी १२ हजार ६१ कोटी रुपयांवर आहे. मात्र कृषिपंपाची वीज भरण्यासाठी ग्राहकांकडून टाळाटाळ केली जात आहे.
Agricultural pump electricity bill
Agricultural pump electricity bill Agrowon

सांगली ः पुणे विभागातील १२ लाख ५४ हजार कृषिपंप (Agriculture Pump) वीज ग्राहकांची डिसेंबरअखेर थकबाकी (Electricity Bill Arrears) १२ हजार ६१ कोटी रुपयांवर आहे. मात्र कृषिपंपाची वीज भरण्यासाठी ग्राहकांकडून टाळाटाळ केली जात आहे. (Agriculture Electricity)

त्यामुळे कृषिपंप धोरण २०२० नुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे. त्यामुले थकीत कृषिपंपाचे बिल भरण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

Agricultural pump electricity bill
Agriculture Electricity : कृषिपंपांची नादुरुस्त रोहित्रे तत्काळ बदलण्याची मोहीम सुरू

राज्यात कृषिपंपासाठी सगळ्यात जास्त विजेचा वापर पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांत होत आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत पाच जिल्ह्यांतील १२ लाख ५४ हजार कृषिपंप वीज ग्राहकांची डिसेंबरअखेर थकबाकी १२ हजार ६१ कोटी रुपयांवर आहे.

Agricultural pump electricity bill
Agriculture Electricity : साहेब... आमच्या पिकांसाठी वीज तरी द्या

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासनाने नवीन कृषिपंप धोरण २०२० तयार केले आहे. या धोरणाची अंमलबजावणी जानेवारी २०२१ पासून करण्यात येत असून, जानेवारी २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत यावर ५० टक्के सूट देण्यात आलेली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२३ पर्यंत थकबाकी भरणाऱ्या ग्राहकांना थकबाकीवर ३० टक्के सूट देण्यात येणार आहे.

तसेच एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत या योजनेवर ३० टक्के सूट देण्यात येत असून, विलंब आकार व व्याज पूर्णतः माफ करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे महावितरणने केले आहे.

थकबाकी दृष्टिक्षेपात...

मंडळ...ग्राहक संख्या...थकबाकी रक्कम

सोलापूर ...३ लाख ६८ हजार... ५३३८ कोटी

सांगली... ३ लाख ४० हजार...१५७६ कोटी

बारामती...१ लाख ८८... २३७९ कोटी

सातारा... १ लाख ८४ हजार १००० कोटी

कोल्हापूर १ लाख ४६ हजार १९६२ कोटी

पुणे ग्रामीण...१ लाख २० हजार ११३८ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com