Bird Migration : मंगळवेढ्यात पाहुणचाराला आले परदेशी पाहुणे

नराच्या चोचीवर मोठा फुगवटा किंवा गाठ असते नराचा आकार सुमारे तीस इंच असतो आणि मादीचा आकार पंचवीस ते सव्वीस इंच असतो.
Solapur Bird News
Solapur Bird NewsAgrowon

करकंब : उष्णकटिबंधीय प्रदेशातील उपसहारा मादागास्कर या ठिकाणी आढळणारा नकटा बदक (Duck) हा स्थलांतरित पक्षी प्रथमच मंगळवेढा (Magalvedha) येथील महिला हॉस्पिटलच्या मागे असणाऱ्या पाणथळीच्या जागी आढळून आला आहे. त्यामुळे पक्षी (Bird Observation) निरीक्षकांसह निसर्गप्रेमींना एक नवी पर्वणी मिळाली आहे.

आकाराला इतर बदकांच्या तुलनेने मोठा असल्याने नकटा बदक लगेच ओळखता येतो. त्याला पाणथळ्या जवळील झाडावर राहायला आवडते. त्याच्या चोचीवर मोठा फुगवटा असतो.

त्यामुळे तो सहजपणे ओळखता येतो. डोके व मानेचा रंग पांढरा असून त्यावर काळे ठिपके असतात. पिसांचा रंग काळा जांभळा असतो.

शेपटीची वरची पिसे हिरवट आणि खालचा संपूर्ण भाग पांढरा असतो. डोळे राखाडी गुलाबी व चोच काळी असते.

नराच्या चोचीवर मोठा फुगवटा किंवा गाठ असते नराचा आकार सुमारे तीस इंच असतो आणि मादीचा आकार पंचवीस ते सव्वीस इंच असतो.

पाणथळीच्या काठावर असलेल्या झाडांच्या फांद्यांवर, पोकळीत कोरड्या काटक्या, इत्यादीने तो घरटे बांधतो. ज्यामध्ये मादी एका वेळेस दहा ते बारा अंडी घालते. सुरवातीला अंड्यांचा रंग तीव्र पांढरा असतो नंतर राखाडी होतो. हा कळपाने राहणे पसंत करतो.

Solapur Bird News
Karnala Bird Sanctuary : कर्नाळा पक्षी अभयारण्य पुन्हा पर्यटकांनी गजबजले

याशिवाय थापट्या किंवा परी बदक म्हणजेच Northern Shoveler, अतिशय सुंदर आणि देखणा असा सुंदर बटवा (Euresian Teal किंवा Euresian Green Winged Teal), चक्रवाक (Rudhy Shelduck), Purple Heron म्हणजेच जांभळा बगळा, मोर शराटी (Glossy Ibis), Blue Throat म्हणजेच शंकर, आदी पक्ष्यांचे पाणथळ जागी आगमन झाले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com