Cotton : देशात एक कोटी १० लाख कापूस गाठींची आवक

भारतीय रुई, सुताच्या निर्यातीला चालना मिळणे शक्य
 Cotton
Cotton Agrowon

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा
जळगाव ः देशात एक कोटी १० लाख गाठींची (एक गाठ १७० किलो रुई) आवक (Cotton Arrival) झाली आहे. यातच भारतीय कापूसदर (Cotton Rate) व जगातील कापूसदर एकसारखे झाले आहेत. यामुळे भारतीय रुई, सुताच्या निर्यातीला चालना मिळू शकते, अशीही स्थिती तयार झाली आहे.
मागील हंगामात नाताळपर्यंत देशात सुमारे १६० लाख गाठींची आवक झाली होती. यंदा कापूस दर स्थिर नसल्याने आवक कमी राहिली आहे. तसेच उत्पादनाबाबतही वेगवेगळी स्थिती विविध भागांत आहे. देशात सर्वाधिक कापूस आवक उत्तर भारतात झाली आहे. मागील पंधरवड्यात राज्यात रोज १५ ते १७ हजार गाठींची आवक होत होती. ती या पंधरवड्यात वाढून प्रतिदिन ३० हजार गाठी एवढी झाली आहे.

 Cotton
Cotton Production : देशात ३४४ लाख कापूस गाठींचे उत्पादन

भारतीय कापूस दर नरमले
जगात भारतीय रुईचे दर १४ ते १५ टक्के अधिक असल्याचा मुद्दा सतत चर्चेत होता. कापूस आयात करा, देशात कापूस तुटवडा आहे, अशी मागणीही काही संस्था करीत होत्या. अशातच कापूस दरात सतत घसरण झाली. मागील तीन दिवसांत खंडीचे दर (३५६ किलो रुईची एक खंडी) तीन हजार रुपयांनी घटले असून, ५७ हजार ५०० रुपये खंडी, असे दर जागतिक बाजारात झाले आहेत. भारतीय रुई देशातील रुईच्या तुलनेत १४ ते १५ टक्के महाग होती. सुतीचे दरही जागतिक बाजाराच्या तुलनेत भारतात अधिक होते. यामुळे निर्यात फारशी नव्हती. भारतीय कापसाचे दर जागतिक बाजारातील कापूस दारांएवढेच आहेत. यामुळे पुढे निर्यातीला चालना मिळू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करीत आहेत.

 Cotton
Cotton Rate : देशात कापूस दराची स्थिती काय राहील? | Agrowon | ॲग्रोवन

नाताळचा परिणाम
शनिवार (ता. २४), रविवार (ता. २५) व सोमवारी (ता. २६) न्यू यॉर्क वायदा बंद होता. नाताळमुळे हा बाजार बंद आहे. युरोप व इतर भागांत नाताळच्या सुट्ट्या असतात. यामुळे कापूस दर काही दिवस दबावात राहतील. नाताळनंतर दरांबाबत सकारात्मक हालचाली होऊ शकतात, असाही मुद्दा आहे. कारण देशात एकूण उत्पादनातील किमान ४० ते ४२ टक्के कापसाची बाजारात आवक झाली आहे. शेतकऱ्यांकडील कापूस साठा मागील काही दिवसांत झपाट्याने कमी झाला आहे. तसेच नाताळनंतर देशातील कापड उद्योगही गती घेऊ शकतो.


नाताळचा परिणाम देशातील कापूस बाजारावर सध्या दिसत आहे. कापूस दरात घसरण झाली आहे. पण देशात कापसाची आवक वाढली आहे. शेतकऱ्यांकडील कापूससाठा कमी होताना दिसत असून, देशातील कापूसदर व जगातील दर सारखेच झाले आहेत. यामुळे निर्यातीबाबत सकारात्मक चित्र दिसत आहे.
- अविनाश काबरा, संचालक, महाराष्ट्र राज्य जिनिंग प्रेसिंग कारखानदार असोसिएशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com