Weather Update : उन्हाचा चटका, उकाड्यात वाढ

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात चांगलीच वाढ झाली आहे. आज (ता. ३०) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणे : पावसाने उघडीप (Rain Recede) दिल्याने राज्यात उन्हाचा चटका (Temperature) आणि उकाड्यात (Heat) चांगलीच वाढ झाली आहे. आज (ता. ३०) दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज (Rain Forecast with Lightning) आहे. तर उर्वरित राज्यात मुख्यतः उघडीप राहण्याची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा हिमालयाच्या पायथ्याकडे कायम असून, उत्तर झारखंड आणि परिसरावर तसेच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावरील चक्राकार वाऱ्यांपासून आग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत, तसेच उत्तर अंदमान समुद्रापासून दक्षिण तमिळनाडू पर्यंत हवेचे कमी दाबाचे पट्टे सक्रिय आहेत.

Weather Update
Rain : जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी

पावसाची उघडीप, अंशतः ढगाळ हवामान, स्वच्छ सूर्य प्रकाश यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाड्यात वाढ झाली आहे. यातच पावसाला पोषक हवामान असल्याने आज (ता. ३०) दक्षिण कोकण रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील जिल्ह्यांत विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह कमाल तापमान आणि उकाड्यातील वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

रत्नागिरी, सिंधदुर्ग, पुणे, नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com