Sugar Factory Election : घोडगंगा’वर पुन्हा अशोक पवारांचे वर्चस्व

अत्यंत चुरशीने झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार ॲड. अशोक पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल विजयी झाला.
Election Of Cooperative Sugar Factory
Election Of Cooperative Sugar FactoryAgrowon

शिरूर, जि. पुणे ः अत्यंत चुरशीने झालेल्या रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या (Ghodganga Sugar Factory) निवडणुकीत आमदार ॲड. अशोक पवार (Adv. ashok Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनेल विजयी झाला. भाजपसह विरोधी पक्षांच्या घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचा त्यांनी अक्षरशः धुव्वा उडविला. वीस जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विरोधकांना केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले.

विधानसभा निवडणुकीनंतर मुळातच गलितगात्र झालेल्या विरोधकांना आमदार पवार यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून आणखी एक जोराचा धक्का दिल्याने तालुक्याच्या राजकीय पटलावर ‘राष्ट्रवादी पुन्हा’चा नाद घुमला. घोडगंगा कारखान्याच्या २१ जागांपैकी ‘ब’ गटातून ऋषिराज पवार यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे उर्वरित २० जागांसाठी रविवारी (ता. ६) चुरशीने ७१.६६ टक्के मतदान झाले.

Election Of Cooperative Sugar Factory
Crop Protection : ट्रायकोडर्मा वापरण्याच्या विविध पद्धती कोणत्या?

त्यानंतर सोमवारी (ता.७) न्हावरे फाटा (ता. शिरूर) येथील कानिफनाथ गार्डन मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पुणे विभागाचे विभागीय उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी काम पाहिले. शिरूरचे सहायक निबंधक शंकर कुंभार यांनी त्यांना साथ दिली. वडगाव रासाई गटात आमदार पवार यांनी सुमारे अडीच हजार मतांच्या फरकाने एकतर्फी विजय संपादन केला.

त्यांच्यासह शेतकरी पॅनेलचे दुसरे उमेदवार उमेश सुदाम साठे यांनीही आमदारांच्या पाठोपाठ विजय मिळविला. किसान क्रांती पॅनेलचे वीरेंद्र दत्तात्रेय शेलार व सुभाष हनुमंत शेलार यांचा मोठा पराभव झाला. न्हावरे गटात राष्ट्रवादीचे संजय काळे, मानसिंग कोरेकर व शरद निंबाळकर विजयी झाले. किसान क्रांती पॅनेलच्या अशोक गारगोटे, पांडुरंग दुर्गे व दत्तू शेंडगे यांचा त्यांनी पराभव केला.

विजयी उमेदवार कंसात त्यांना मिळालेली मते अशी...

शेतकरी विकास पॅनेल - ॲड. अशोक पवार (८१७२), संजय काळे (७८२६), सचिन मचाले (७७६८), शरद निंबाळकर (७७३२), सोपानराव गवारी (७६८६), मानसिंग कोरेकर (७६३९), वाल्मीकराव कुरंदळे (७६१९), नरेंद्र माने (७४५२), सुहास थोरात (७४१७), उमेश साठे (७४०९), प्रभाकर पाचुंदकर (७३७८), विश्‍वास ढमढेरे (७३६२), संभाजी फराटे (७१८०), पोपट भुजबळ (७१३६), मंगल कोंडे (७६४५), वैशाली जगताप (७५५१), उत्तम सोनवणे (७६१४), शिवाजी गदादे (७४२६), बिरा शेंडगे (७२०९), ऋषिराज पवार (बिनविरोध). घोडगंगा किसान क्रांती पॅनेलचे विजयी उमेदवार- दादासाहेब पाटील-फराटे (६९३१).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com