आसाममध्ये पार पडली शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक

राज्यातील नोंदणी केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आसाम ॲग्रीबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टतर्फे ही बैठक आयोजित करण्यात आली.
आसाममध्ये पार पडली शेतकरी उत्पादक कंपन्यांची बैठक
Farmer Producer OrganisationAgrowon

आसाममधील राज्यातील कृषी अर्थकारणाला चालना देण्यासाठी गुवाहाटी येथे नुकतीच शेतकरी उत्पादक कंपन्यांची (FPC) एक बैठक घेण्यात आली. राज्य पातळीवर घेण्यात आलेली ही पहिलीच बैठक होती.

राज्यातील नोंदणी केलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना (FPC) एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आसाम ॲग्रीबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टतर्फे (APART) ही बैठक आयोजित करण्यात आली. कृषीमंत्री अतुल बोरा, कृषी संचालक अनंत लाल ग्यानी यांच्यासह राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी या बैठकीस हजर होते.

राज्यातील १२५ शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण करणे हे आसाम ॲग्रीबिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रोजेक्टचे (APART) उद्दिष्ट आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीकडे कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) असेल. तसेच कस्टम हायरिंग सेंटर (CHC)असणार आहे.

याशिवाय 'अपार्ट'तर्फे या कंपन्यांना माहिती व तंत्रज्ञान, विपणन इत्यादी विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आसामचे कृषी मंत्री अतुल बोरा यांनी म्हटले. राज्यातील शेतकऱ्यांना अनुदानित कंबाइन हार्वेस्टर देण्यात येत आहेत. राज्यात लवकरच दूध प्रक्रिया केंद्र आणि पोर्क प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत असल्याचेही बोरा म्हणालेत. राज्यात येत्या काळात भरडधान्य अभियान राबवण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांचे व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, उत्पादकता वाढवणारे तंत्रज्ञान, काढणी/ कापणीनंतरचे व्यवस्थापन, मूल्यवृद्धी इत्यादीबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे राज्याचे कृषी संचालक अनंत लाल ग्यानी म्हणालेत. या शेतकरी उत्पादक कंपन्यांना स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडण्यासाठी कृषी मंत्रालयाकडून प्रयत्न केले जात आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com