Sugarcane : ऊस शिल्लक राहिलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी

जिल्ह्यातील गाळपाअभावी उभ्या राहिलेल्या उसाचे पंचनामे करावेत. सर्व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे.
Sugarcane
SugarcaneAgrowon

परभणी ः जिल्ह्यातील गाळपाअभावी (Sugarcane Without Crushing) उभ्या राहिलेल्या उसाचे पंचनामे (Survey Of Non Crushed Sugarcane) करावेत. सर्व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत (Financial Assistance To Sugarcane Farmer) द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे करण्यात आली आहे.

Sugarcane
Sugarcane FRP : ‘एफआरपी’त वाढीतील चलाखी

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये साखर कारखान्यांनी ऊस गाळपास नेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचा ऊस शेतात उभा आहे. ऊस गाळप न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

उभ्या उसाचे पंचनामे करून सर्व संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमृत कदम यांनी दिला. या वेळी माऊली जोगंड, सुनील कदम, विश्वंभर गोरवे, माधव जोगदंड, सखाराम इंगळे आदींनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com