पीक नुकसानग्रस्तांना निकषाप्रमाणे मदत

सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई देण्यात येईल.
Crop Damage
Crop DamageAgrowon

बाळासाहेब पाटील

मुंबई : सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान (Farmer's Loss Due To Continues Rain) झाल्यास एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे नुकसानभरपाई (Compensation As Per Norms) देण्यात येईल. तसेच सोयाबीनवरील गोगलगाय (Snail Outbreak On Soybean) आणि यलो मोझॅक (Yellow Mosaic) प्रकरणी नुकसानभरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत मंगळवारी (ता. २३) केली. विरोधकांच्या आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टी बाधितांसाठी कोणतीही ठोस घोषणा न केल्याने आणि ओला दुष्काळ जाहीर न केल्याने विरोधकांनी सभात्याग केला.

Crop Damage
Crop Damage : तीन लाख शेतकऱ्यांच्या नजरा अधिवेशनाकडे

अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नियम २९३ अन्वये आठवडा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर विरोधी आणि सत्ताधारी सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामी, ओला दुष्काळ जाहीर करून भरीव मदतीची मागणी केली होती. या चर्चेला मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी उत्तर दिले. ते म्हणाले, ‘‘अतिवृष्टीच्या काळात ६५ मि.मी.पेक्षा जास्त पाऊस पडल्याने नुकसान झाल्यास भरपाई देण्यात येते. मात्र चर्चेदरम्यान अनेक सदस्यांनी सततच्या पावसाचा मुद्दा मांडला होता. सततच्या पावसामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल.’’

Crop Damage
Crop Damage : ऑगस्टमध्ये १ लाख ३७ हजार हेक्टरवर पिकांना पावसाचा फटका

गोगलगाय, यलो मोझॅकचे होणार पंचनामे

गेल्या काही दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीनवर गोगलगाय आणि यलो मोझॅकचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे होणाऱ्या नुकसानीबाबतही पंचनामे करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

कृषी कार्यालय, तहसील कार्यालयात नुकसानीची माहिती

पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी विमा कंपन्यांना पीक नुकसानीची माहिती ठरावीक काळात देणे बंधनकारक आहे, आता ही सूचना कृषी कार्यालय, तहसील कार्यालय किंवा ज्या बँकेत विमा भरलेला आहे, अशा ठिकाणी नुकसानीची सूचना, अर्ज स्वीकारले जातील व हे अर्ज ग्राह्य धरले जातील अशा लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले.

अन्य घोषणा...

- महसूल मंडळात उभारण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्रांची संख्या वाढविणार

- नियमित कर्जफेड केलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान वाटप १५ सप्टेंबरपासून

- पंचनाम्यासाठी मोबाईल अॅपचा वापर

- दरड आणि आपत्तिग्रस्त क्षेत्राच्या पुनर्वसनाबाबत लवकरच धोरण निश्‍चित करण्यात येईल.

- शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वकष कृती आराखडा करण्यात येईल.

विरोधकांचा सभात्याग

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रस्तावाला उत्तर दिल्यानंतर विरोधी पक्षनेते श्री. पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे आम्ही ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या मुलांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे आणि अन्य मागण्या केल्या होत्या. मात्र राज्य सरकारने कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही.’’ सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करत विरोधकांनी या वेळी सभात्याग केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com