Agriculture University : कृषी विद्यापीठात १८ ते २० दरम्यान शिवार

डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पंदेकृवि) मुख्यालयात यंदा १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
Agricultural University
Agricultural UniversityAgrowon

अकोला ः येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या (पंदेकृवि) (Punjabrao Deshmukh Krushi Vidypeeth) मुख्यालयात यंदा १८ ते २० ऑक्टोबर दरम्यान शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. (Agricultural Technology) शेतकऱ्यांसाठी या फेरीचे दिवस व जिल्हानिहाय नियोजन केले आहे.

Agricultural University
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेले वेगवेगळे वाण, तंत्र, यंत्राची पाहणी शेतकऱ्यांना थेट प्रक्षेत्रावर करता येते. या ठिकाणी संबंधित विभागांचे शास्त्रज्ञ उपस्थित राहून शेतकऱ्यांना माहितीसुद्धा देतात.

Agricultural University
Crop Damage : वाढीव निकषाने भरपाईसाठी २७७ कोटी रुपयांचा प्रस्ताव

या शिवाय शिवारफेरीनंतर विद्यापीठाच्या सभागृहात शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमही होत असतो. विदर्भातील ११ जिल्ह्यांचे शेतकरी दरवर्षी या कार्यक्रमात सहभागी होत असतात. गेल्या दोन हंगामात कोरोना काळामुळे नियंत्रित स्वरूपाचे आयोजन करण्यात आले होते.

यंदा मात्र पूर्वीसारखे नियोजन करण्यात आले गेले आहे. मंगळवारी (ता.१८) अकोला, यवतमाळ, वर्धा व गडचिरोली, बुधवारी (ता.१९) बुलडाणा, चंद्रपूर व नागपूर आणि गुरुवारी (ता.२०) वाशीम, अमरावती, भंडारा व गोंदिया या जिल्ह्यातील

शेतकऱ्यांना प्रक्षेत्रावर भेटीचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतकऱ्यांनी शिवार फेरीला उपस्थित राहण्याचे आवाहन डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com