आमदार अनिल भोसलेंच्या जमिनीचा लिलाव

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Pune Agriculture Produce Market Committee) या लिलावात सहभागी होऊन ६० कोटी ४१ लाख ७४ हजार ७०९ रुपयांनी जमीन जाहीर लिलावाद्वारे खरेदी केली आहे.
 Agriculture Market Committee
Agriculture Market CommitteeAgrowon

पुणे ः शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेल्या आमदार अनिल भोसले (Anil Bhosale) यांची सुमारे १३ एकर जमीन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Pune Agriculture Produce Market Committee) ६० कोटी रुपयांना लिलावात खरेदी केली असल्याची माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँकेने न्यायालयाच्या आदेशाने कोरेगाव मूळ (ता. हवेली) येथील पुणे सोलापूर हायवेलगत ५.५२ हेक्टर (सुमारे १३ एकर) जमिनीच्या जाहीर लिलावाची प्रक्रिया निश्‍चित केली होती.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Pune Agriculture Produce Market Committee) या लिलावात सहभागी होऊन ६० कोटी ४१ लाख ७४ हजार ७०९ रुपयांनी जमीन जाहीर लिलावाद्वारे खरेदी केली आहे. भविष्यातील वाढते नागरीकरण, नियोजित रिंग रोड, शेतकरी व सर्व बाजार घटकांची सुविधा विचारात घेता या ठिकाणी भविष्यात अत्याधुनिक सोयीसुविधांसह उपबाजार कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचे गरड यांनी सांगितले.

नवीन होणाऱ्या उपबाजारामुळे शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या खर्चात आणि वेळेत बचत होणार आहे. तसेच गुलटेकडी मार्केट यार्ड (Market yard) येथे परराज्यांतून अवजड वाहनांतून येणारा गाजर, वाटाणा, मिरची, फळेभाजीपाला, कांदा, बटाटा व इतर शेतीमाल या ठिकाणी विक्री करता येईल.

खरेदी केलेली जमीन उरुळी कांचन (Urli Kanchan) रेल्वे स्थानकानजीक असल्यामुळे राज्यातील आणि परराज्यांतील शेतकरी व व्यापाऱ्यांना कमी खर्चात रेल्वेने शेतीमाल आणता येईल. शेतीमालाच्या वाहतुकीसाठी सोयीचे आणि फायद्याचे होणार आहे.

त्यामुळे गुलटेकडी मार्केट यार्ड येथे येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या कमी होईल, वाहतूक खर्चात बचत होईल, प्रदूषण काही प्रमाणात कमी होईल, तसेच गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील ताण कमी होऊन शेतकरी व सर्व बाजार घटकांचा निश्‍चित फायदा होईल. तसेच उत्पन्नात वाढ होईल, असा विश्‍वास गरड यांनी व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com