औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतरावर दुसऱ्यांदा मोहर

या प्रस्तावांना अधिवेशनात मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हे प्रस्ताव सादर करून मंजुरी घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.
Chatrapati Smbhajinagar
Chatrapati SmbhajinagarAgrowon

मुंबई : औरंगाबाद (Aurangabad) शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव (Dharashiv) करण्याबाबतच्या प्रस्तावास शनिवारी (ता.१६) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) होते.

हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. या बाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमाप्रमाणे करण्यात येईल, असे शिंदे यांनी सांगितले.

या प्रस्तावांना अधिवेशनात मंजुरी घ्यावी लागेल. त्यानंतर केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हे प्रस्ताव सादर करून मंजुरी घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले.

दरम्यान, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (International Airport) ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ (Cabinet) बैठकीत घेण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com