Waghad Canal : वाघाड कालव्यावर प्रायोगिक तत्त्वावर ऑटोमेशन

केंद्राच्या योजनेतून दोन वर्षांपूर्वी वाघाड आणि आसाममधील लघुसिंचन तलावाची ‘ऑटोमेशन’साठी निवड झाली आहे. त्याद्वारे प्रकल्पाचे परिचालन होण्याच्या अनुषंगाने दरवाजे उघडणे आणि बंद करणे ही कामे सेन्सरच्या माध्यमातून होणार आहेत.
Waghad Canal
Waghad CanalAgrowon

नाशिक : केंद्राच्या योजनेतून दोन वर्षांपूर्वी वाघाड (Waghad Canal) आणि आसाममधील लघुसिंचन तलावाची (Irrigation) ‘ऑटोमेशन’साठी निवड झाली आहे. त्याद्वारे प्रकल्पाचे परिचालन होण्याच्या अनुषंगाने दरवाजे उघडणे आणि बंद करणे ही कामे सेन्सरच्या माध्यमातून होणार आहेत. वाघाड डाव्या कालव्यावर प्रायोगिक तत्त्वावर ‘ऑटोमेशन’ करण्यात येईल, अशी माहिती गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. संजय बेलसरे यांनी दिली.

Waghad Canal
Agricultural Irrigation : सिंचनासाठी ‘गिरणा’तून मिळणार पाच आवर्तने

मोहाडी (ता. दिंडोरी) येथील वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेतर्फे वाघाड धरण जलपूजन डॉ. बेलसरे, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, प्रकल्पस्तरीय संस्थेचे अध्यक्ष अरुणराव घुमरे व सौ. घुमरे यांच्या हस्ते झाले. या वेळी लाभक्षेत्रातील शेतकरी, प्रकल्पस्तरीय पाणीवापर संस्थांचे व पाणीवापर संस्थांचे पदाधिकारी बाजीराव शिंदे, सागर पगारे, शहाजी सोमवंशी, शिवाजी पिंगळे, रघुनाथ कदम, रमेश पाटील, सौ. वडजे, रामनाथ वाबळे, समाज परिवर्तन केंद्राचे लक्ष्मीकांत वाघवकर, कार्यकारी अभियंता राजेश गोवर्धने, उपकार्यकारी अभियंता राजेंद्र बघान, उपअभियंता हर्षद देवरे, शाखाधिकारी भंडारी आदी उपस्थित होते.

Waghad Canal
Drip Irrigation : ठिबकच्या वापराबाबत राज्यभर माहितीचा अभाव

डॉ. बेलसरे म्हणाले, की ‘ऑटोमेशन’मधून शेतकऱ्यांना काही नवीन बाबी शिकावयास मिळणार आहेत. पाणीवापर संस्थांबाबत काही शंका असल्यास नाशिक येथील पालखेड पाटबंधारे विभागात सुरू केलेल्या मार्गदर्शन कक्षाशी संपर्क साधावा.

Waghad Canal
Drip Irrigation : ठिबकच्या वापराबाबत राज्यभर माहितीचा अभाव

रब्बी हंगामपूर्व बैठक

जलपूजनानंतर शेतकरी, अभियंता आणि पदाधिकाऱ्यांची रब्बी हंगामपूर्व बैठक झाली. श्री. सोमवंशी म्हणाले, की कालव्याच्या वहन क्षमतेपेक्षा अधिक प्रवाह होत असल्याने भरावाच्या ठिकाणी पाणी उचंबळून ते भरावावरून वाहून कालव्याचा भराव नेहमी फुटतो. अशा घटना दरवर्षी होत असल्याने त्यावर जलसंपदा विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी.

वाघवकर म्हणाले, की पाणीपट्टी रकमेचा परताव्याबाबत सचिवांच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी जलसंपदाचे प्रशासकीय व्यवस्थेने करावी. पाणी वापराची कार्यक्षमता, पाण्याचा ताळेबंद आणि पाणीवापर संस्थांचे पाणी नियोजनातील कौशल्याचा भोजापूर व कडवा प्रकल्पावर गोपाल चव्हाण यांनी अभ्यास केला आहे. या वेळी चव्हाण म्हणाले, की भविष्यात पाण्याची मागणी करून हिशेबात आणले नाही, तर ते सिंचनापासून इतरत्र जाऊ शकते. वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेस सरकारच्या निर्णयानुसार पाच टक्के अधिकचा परतावा देण्याबाबत प्रस्ताव पाठविल्याबद्दल डॉ. बेलसरे यांचे आभार मानण्यात आले. श्री. गोवर्धने यांनीही उपस्थितांशी संवाद साधला.

पाणीवापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी प्रयत्नशील राहावे

प्रादेशिक स्तरावरून वाघाड प्रकल्पस्तरीय संस्थेला पाणीपट्टी परताव्यात पाच टक्के वाढ करून देण्याची शिफारस सरकारला वाघाड कालव्यावर तूर्त तरी केली आहे. सरकारच्या धोरणानुसार पाइपलाइनचे काम करता येणार नाही. प्रकल्पावरील सर्व पाणीवापर संस्थांनी पाणी वापराची कार्यक्षमता सुधारण्यासाठी सतत प्रयत्नशील राहायला हवे. कालव्यांची झालेली हानी वेळेत दुरुस्त करण्यात येतील, असे डॉ. बेलसरे यांनी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com