Loan Scheme : ‘थेट कर्ज योजनेचा लाभ घ्या’

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले.
Loan Scheme
Loan Scheme Agrowon

Direct Loan Scheme नंदुरबार : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळामार्फत (Annabhau Sathe Board) राबविण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेचा (Loan Scheme) लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी केले. नंदुरबार जिल्ह्याकरिता वर्ष २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी लाभार्थ्यांना थेट कर्ज योजनेत लाभ देण्याचे उद्दिष्ट आहे.

मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादिंग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या १२ पोटजातींतील व्यक्तींना या योजनेद्वारे अर्थसाह्य करण्यात येणार आहे.

Loan Scheme
Crop Loan : कृषी, संलग्न क्षेत्रासाठी ३ हजारांवर कोटींचे कर्जाचे उद्दिष्ट

अर्जदारास महामंडळाच्या नियमानुसार व्यवसायास अनुरूप असलेली आवश्यक ती कागदपत्रे, प्रमाणपत्रे, कर्ज मागणी अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील. या योजनेत साधारणपणे पुरुष व महिला ५० टक्के आरक्षण राहील, तसेच राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कृत व्यक्ती, सैन्यदलातील वीरगतीप्राप्त झालेल्यांच्या वारसातील एका सदस्यास प्राधान्य देण्यात येईल.

Loan Scheme
Crop Loan : खानदेशात पीककर्ज वाटप संथ

अर्जदारास कर्जमंजुरी व वितरणापूर्वी त्याच्या वारसदाराचे बंधपत्र द्यावे लागेल. कर्ज योजनेचे अर्ज कार्यालयात विनामूल्य उपलब्ध असून, अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत २३ फेब्रुवारी आहे.

हे अर्ज कार्यालयीन वेळेत सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत स्वीकारले जातील. उद्दिष्टांपेक्षा जास्त कर्जप्रकरणे प्राप्त झाल्यास लाभार्थ्यांची निवड शासन आदेशानुसार लॉटरी पद्धतीने समितीमार्फत करण्यात येईल.

मातंग समाजातील होतकरू महिला, पुरुष, प्रशिक्षित लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी जिल्हा व्यवस्थापक, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित नंदुरबार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, टोकर तलाव रोड, नंदुरबार दूरध्वनी क्रमांक ०२५६४-२१०१८१ वर संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com