Grape Market : द्राक्ष व्यवहारात सौदा पावतीचा आग्रह करून फसवणूक टाळा

लग्नासाठी नवी सोयरिक करताना आपण सर्व शहानिशा करून संबंध पक्का करतो. मात्र द्राक्ष विक्री करताना बारकाईने व्यापाऱ्यांची शहानिशा केली जात नसल्याने फसवणुकीचे प्रमाण वाढत आहे.
Grape Season
Grape SeasonAgrowon

Grape Market News नाशिक ः लग्नासाठी नवी सोयरिक करताना आपण सर्व शहानिशा करून संबंध पक्का करतो. मात्र द्राक्ष विक्री (Grape Sale) करताना बारकाईने व्यापाऱ्यांची शहानिशा केली जात नसल्याने फसवणुकीचे (Grape Fraud) प्रमाण वाढत आहे.

त्यामुळे द्राक्ष बागायतदार संघाने तयार केलेल्या सौदा पावतीचा आग्रह धरावा, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी केले.

द्राक्ष उत्पादकांची फसवणूक व उपाययोजनेसंदर्भात शुक्रवारी (ता. १०) पोलिस प्रशासन व द्राक्ष बागायतदार संघ यांच्या विद्यमाने विशेष बैठक पार पडली.

या वेळी शेखर बोलत होते. बैठकीला नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ तांबे, पोलिस निरीक्षक श्री. तिवारी, द्राक्ष बागायतदार संघाचे राज्य उपाध्यक्ष कैलास भोसले, संघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र निमसे, सचिव बाळासाहेब गडाख उपस्थित होते.

Grape Season
Grape Orchard Damage : वाऱ्यामुळे द्राक्ष बागा जमीनदोस्त

शेखर म्हणाले, की देशात कष्ट करून अन्न पिकविणाऱ्याची फसवणूक हे दुर्दैवी आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सौदा पावतीनेच व्यवहार अपेक्षित आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश बिहार, पश्‍चिम बंगाल या राज्यातून व्यापारी येतात. मात्र त्यांची सविस्तर माहिती उपलब्ध नसल्याने तपासात अडचणी येतात.

Grape Season
Grape Crop Damage : पूर्व भागात द्राक्षबागा, गहू, हरभऱ्याचे नुकसान

त्यामुळे शेतकऱ्यांनी अनभिज्ञ न ज्यांच्याशी व्यवहार करतो त्यांची कुंडली जाणून घेतली पाहिजे. उमाप म्हणाले, की अधिक दराच्या लोभापोटी शेतकऱ्यांचे नुकसान होते. असे प्रकार टाळण्यासाठी पोलिस पाटलांच्या मदतीने व्यापाऱ्यांची माहिती गावागावात संकलित केली जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब गडाख यांनी केले. तर रवींद्र निमसे यांनी आभार मानले.

ग्रामसभांनी ठराव करावेत

ग्रामसभेला विशेष अधिकार असल्याने सामूहिक जबाबदारी म्हणून आपल्या गावात आलेला परप्रांतीय व्यापाऱ्यांची सविस्तर माहिती, संपूर्ण पत्ता, आधारकार्ड, पॅनकार्ड, बँकिंग तपशील या बाबत माहिती संकलित करण्यासाठी ग्रामसभेने तसे ठराव करावेत.

शेतकऱ्यांनी मांडलेले मुद्दे :

- धनादेश न वटणे, अधिक दर देऊन द्राक्ष खरेदी, बनावट आधार कार्ड बनवून फसवणूक.

- शेतकरी कक्ष स्थापन करून शेतकऱ्यांच्या तक्रारीवर जलदगतीने कार्यवाही करा.

- मागील वर्षी सौदा पावतीबाबत प्रभावी जनजागृती व्हावी, तसे धोरण निश्‍चित व्हावे.

- स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये व्यापाऱ्यांची हजेरी घेऊन त्यांचे फिंगरप्रिंट घेण्यात यावे.

- परप्रांतीय व्यापाऱ्यांसोबत स्थानिक व्यक्ती पायलट म्हणून काम करते. त्यांची माहिती संकलित करून त्यांना मदत करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा.

पोलिसांनी सुचवलेले पर्याय

- द्राक्ष विक्रीनंतर व्यापाऱ्याने दिलेले धनादेश तपासून घ्यावेत.

- व्यापाऱ्यांची माहिती संकलित करून प्रत पोलिस स्टेशनला द्यावी.

- शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी सौदा पावती लिहून धनादेश घ्या.

- शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची ग्रामपंचायतीत नोंद झाली पाहिजे.

- ग्राम सुरक्षा दल सक्रिय करण्याची गरज, पोलिस यंत्रणेसोबत शेतकऱ्यांनीही सावध असावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com