Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधितांना मदतीची प्रतीक्षा

सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यांतील सततच्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ तालुक्यांतील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील जिरायती पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले.
Crop Damage | Crop Damage Compensation
Crop Damage | Crop Damage CompensationAgrowon

परभणी ः यंदाच्या (२०२२) सप्टेंबर ते ऑक्टोबर या कालावधीत झालेली अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पूर परिस्थितीमुळे परभणी चार तालुक्यांतील आणि हिंगोली जिल्ह्यातील एका तालुक्यांतील असे दोन जिल्ह्यांतील मिळून एकूण पाच तालुक्यांतील १ लाख ४७ हजार ६१३ बाधित (Crop Damage) शेतकऱ्यांना वाढीव दराने आर्थिक मदतीसाठी ९३ कोटी २० लाख रुपये निधी वितरणास गुरुवारी (ता. १७) काढण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे. परंतु अद्याप मदतीची रक्कम (crop Damage Compensation) जमा करण्यात आलेली नसल्याने बाधित शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

Crop Damage | Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : गारपिटीच्या भरपाईपासून केळी उत्पादक वंचित

सप्टेंबर -ऑक्टोबरमधील परतीचा पाऊस, अतिवृष्टीमुळे परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, पूर्णा या चार तालुक्यांतील ९२ हजार ७३७ शेतकऱ्यांच्या ५६ हजार १७५ हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील ५४ हजार ८७६ शेतकऱ्यांच्या १२ हजार ३६० हेक्टरवरील जिरायती पिकांचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

Crop Damage | Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३६०० कोटींची तरतूद

त्यासाठी जिल्हा प्रशासनाने निधीची मागणी केली होती. बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० रुपयांनुसार परभणी जिल्ह्यासाठी ७६ कोटी ३९ लाख ८० हजार रुपये आणि हिंगोली जिल्ह्यांसाठी १६ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये निधी वितरणास मंजुरी देण्यात आली आहे.

बाधितांसाठी २४७ कोटी रुपयांची मागणी

सप्टेंबर - ऑक्टोबर महिन्यांतील सततच्या पावसामुळे परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या ९ तालुक्यांतील ३ लाख ९० हजार ७५८ शेतकऱ्यांच्या १ लाख ८१ हजार ७४२ हेक्टरवरील जिरायती पीकांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले.

त्यात सोयाबीन १ लाख १५ हजार २१० हेक्टर, कापूस ६२ हजार ९४ हेक्टर, उडीद ७०.६४ हेक्टर, ज्वारी ६४७ हेक्टर, मूग ७६.८४ हेक्टर, तूर २ हजार १ हेक्टर या पीकांचा समावेश आहे. बाधितांच्या मदतीसाठी प्रतिहेक्टरी १३ हजार ६०० नुसार २४७ कोटी १६ लाख ९२ हजार २८८ रुपये निधीची मागणी जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. परंतु त्यास मंजुरी मिळालेली नाही.

सप्टेंबर-ऑक्टोबर अतिवृष्टी बाधित शेतकरी, क्षेत्र (हेक्टरमध्ये) मंजूर निधी (कोटी रुपये)

तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र निधी

परभणी ४२३१८ २७२७४ ३७.०९

सेलू ८६२६ ५४८२ ७.०८

पाथरी १०१४३ ७१६२ ९.७४

पूर्णा ३१८५० १६२५७ २२.१०

औंढा नागनाथ ५४८७६ १२३६० १६.८०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com