Pesticide : कीटकनाशक फवारणीबाबत अकोला जिल्हयात जनजागृती अभियान

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व एफएमसी प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात या हंगामात फवारणी करीत असताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले.
Insecticide Spraying
Insecticide SprayingAgrowon

अकोला : महाराष्ट्र राज्य कृषी विभाग (Agricultural Department) व एफएमसी प्रा. ली. यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात या हंगामात फवारणी करीत असताना घ्यावयाच्या काळजीबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. याचा शुभारंभ जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने, उपाध्यक्षा सवित्रीताई राठोड यांच्या हस्ते झाला होता.

Insecticide Spraying
Crop Insurance : पीकविमा भरपाईसाठी परभणीत किसान सभेचे धरणे आंदोलन

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, कृषी समिती सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा परिषद सदस्या पुष्पाताई इंगळे, गोपाल दातकर, जिल्हा कृषी अधीक्षक आरिफ शाह, कृषी विकास अधिकारी मुरली इंगळे, मोहीम अधिकारी मिलिंद जंजाळ, कंपनीचे एरिया मार्केटिंग मॅनेजर हिरामण मंडळ

Insecticide Spraying
Crop Damage : पाच जिल्ह्यांत परतीच्या पावसाचा जोर कायम

तसेच अकोला जिल्हा प्रतिनिधी शत्रुघ्न उपरवट उपस्थित होते. गेल्या तीन वर्षांपासून ही कंपनी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कीटकनाशक फवारणी करीत असताना घ्यावयाची काळजीबाबत जनजागृती करीत आहे.

यंदा जनजागृती रथाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सातही तालुक्यातील १२० गावांमध्ये ग्रामपंचायत, शाळा , विद्यालय तसेच चौकांमध्ये याबाबत कार्यक्रम घेतले. या वेळी संबंधित तालुका कृषी अधिकारी तसेच कंपनी प्रतिनिधींनी एकत्र येऊन विषबाधा रोखण्यासाठी जनजागृती केली.

शेतकरी व शेतमजुरांना ५६० सुरक्षा किट मोफत वाटप केल्या. या उपक्रमाचा नुकताच समारोप बार्शीटाकळी तालुक्यातील आळंदा येथील जय बजरंग विद्यालयामध्ये झाला. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य शत्रुघ्न बिरकड, कृषी अधिकारी संजय चांदूरकर, कंपनीचे जिल्हा प्रतिनीधी शत्रुघ्न उपरवट यांनी विषबाधा जनजागृती अभियानविषयक मार्गदर्शन केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com