Atal Bhujal Scheme : दीड लाख नागरिकांमध्ये होणार ‘अटल भूजल’ची जनजागृती

गेल्या दोन वर्षांपासून राज्यात अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेची अधिक माहिती गावातील नागरिकांना होऊन पाण्याचे महत्त्व वाढीस लागावे
Atal Bhujal Scheme
Atal Bhujal SchemeAgrowon

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात अटल भूजल योजना (Atal Bhujal Scheme) राबविण्यात येत आहे. या योजनेची अधिक माहिती गावातील नागरिकांना होऊन पाण्याचे महत्त्व वाढीस लागावे, यासाठी भूजल विभागाकडून (Bhujal Department) माहिती पत्रके तयार करण्यात आली आहेत. हे माहितीपत्रके राज्यातील १३ जिल्ह्यांतील एकूण १४४२ गावांतील तब्बल दीड लाख नागरिकांना देऊन जनजागृती करणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याची दिशा समजण्यास सोईचे होईल.

Atal Bhujal Scheme
Sugar Production : जगात यंदा साखर उत्पादन वाढणार

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा संचालनालय स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त अटल भूजल योजनाचे माहितीपत्रकाचे प्रकाशन पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या वेळी अटल भूजल योजनेच्या माहितीपत्रकाचे महत्त्व सांगण्यात आले. केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसाह्यित अटल भूजल योजना २०२० पासून महाराष्ट्रासह देशातील एकूण महाराष्ट्र, हरियाना, उत्त प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि कर्नाटक अशा सात राज्यांत राबविण्यात येत आहे.

Atal Bhujal Scheme
Crop Insurance : वर्धा जिल्ह्यात पिकविम्याचे सात कोटी रूपये शेतकऱ्यांच्या खात्यात

योजनेची मुख्य उद्दिष्टे, योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये, प्रमुख घटक व अंमलबजावणीचा कालावधी देण्यात आला आहे. याशिवाय प्रमुख निर्देशांक व त्यांची अंमलबजावणी कशी करावी, या बाबतची टप्प्यानिहाय माहिती देण्यात आली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात पूर्वतयारीचा व मूलभूत माहिती संकलनाचा टप्पा, दुसरा टप्पा नियोजन टप्पा जलसुरक्षा आराखडा तयार करणे, तिसरा टप्पा जलसुरक्षा आराखड्याची अंमलबजावणी व संनियंत्रण, चौथा टप्पा भूजलाच्या शाश्‍वत व्यवस्थापनासाठी दरवर्षी करावयाची कामे अशी माहिती माहितीपत्रकात दिली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून अटल भूजल योजनेचे काम भूजल विभागाने हाती घेतले आहे. त्या अनुषंगाने निवडलेल्या गावांत पाण्याविषयीची जनजागृती होण्यासाठी ही माहितीपत्रके तेथील नागरिकांना देण्यात येतील.

- चिंतामणी जोशी, आयुक्त, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पुणे

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com