Millet Farming : भरडधान्याच्या पौष्टिकतेबाबत जागृती गरजेची ः डॉ. दलवाई

भरडधान्याची पौष्टिकता महत्त्व पटण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे,’’ असे मत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केले.
Millet
MilletAgrowon

नगर ः ‘‘शासकीय योजनांच्या साहाय्याने तसेच शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या नवीन तंत्रज्ञानाने भरडधान्याची (Bharaddhanya) शेती फायदेशीर ठरू शकते. भरडधान्यांमध्ये असलेली पौष्टिकता मानवी आरोग्यासाठी गरजेची आहे.

भरडधान्याची पौष्टिकता (Nutritious of rich grains) महत्त्व पटण्यासाठी जागृती करणे गरजेचे आहे,’’ असे मत नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी व्यक्त केले.

देशभरात या वर्षी आंतरराष्ट्रीय पौष्टिक भरडधान्य वर्ष साजरे केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषी विद्यापीठात कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पौष्टिक भरडधान्य दिन साजरा केला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाला नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पर्जन्य क्षेत्र प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई, संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, कुलसचिव प्रमोद लहाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार, डॉ. बापूसाहेब भाकरे, डॉ. गोरक्ष ससाणे यांच्यासह सर्व विभागांचे विभाग प्रमुख व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. दलवाई, शेतकऱ्यांसाठी भरडधान्याचे उत्तम बीज आणि अधिक उत्पादनशील वाण यावर संशोधन होणे गरजेचे आहे.

Millet
Wheat Crop : खानदेशात गहू पीक जोमात

विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे हवामान बदलाचा सामना आपण करू शकतो. दैनिक आहारात भरडधान्याचा समावेश असावा, त्यासाठी भरडधान्याबाबतच्या पौष्टिकतेविषयी महत्त्व पटवून देण्यासाठी जनजागृती गरजेची आहे.

यावेळी डॉ. सुनील गोरंटीवार यांनी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त विद्यापीठामध्ये वर्षभरात नियोजित केलेल्या कार्यक्रमांविषयी माहिती दिली. कृषी वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक यांनी पौष्टिक तृणधान्य दिनानिमित्त वेगवेगळ्या तृणधान्याच्या माहितीसह विद्यापीठात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली.

यावेळी नवी दिल्लीच्या कृषी वैज्ञानिक परीक्षेत यशस्वी झालेल्या काशिनाथ तेली या विद्यार्थ्याचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यापीठाच्या कास्ट-कासम प्रकल्पाच्या ड्रोन प्रयोगशाळा, आय. ओ. टी. तंत्रज्ञानचलित सिंचन प्रणाली, रोबोटिक्स तंत्रज्ञान प्रयोगशाळा, आय.ओ.टी. पार्क, कास्ट-कासम प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प, ज्वारी सुधार प्रकल्पाला भेटी दिल्या. डॉ. मुकुंद शिंदे, डॉ. सचिन नलावडे, डॉ. दीपक दुधाडे, डॉ. पवन कुलवाल, डॉ. सुनील कदम, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. रवी आंधळे आदी यावेळी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com