Nandurbar Z.P. : नंदुरबार जिल्हा परिषदेत स्वकीय पदांपासून दूर

सभापती निवडीत भाजपने स्वपक्षापेक्षाही सत्तांतरासाठी सहकार्य करणाऱ्या पक्षाच्या सदस्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित व खासदार डॉ. हीना गावित यांनी केला.
Nandurbar ZP
Nandurbar ZPAgrowon

नंदुरबार ः सभापती निवडीत भाजपने (BJP) स्वपक्षापेक्षाही सत्तांतरासाठी सहकार्य करणाऱ्या पक्षाच्या सदस्यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Dr. Vijaykumar Gavit) व खासदार डॉ. हीना गावित (Dr. Heena Gavit) यांनी केला. त्यामुळे स्वपक्षातील पदाधिकारी व सदस्य दुखावले आहेत. मात्र पक्षातील दुखावलेल्या सदस्यांची नाराजी लवकरच दूर होईल, असा सूर आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसचे बहुमतातील सत्ता उलथावून भाजपचे कमळ फुलले. अध्यक्षपदी डॉ. सुप्रिया गावित (Dr. Supriya Gavit) विराजमान झाल्या.

सत्तांतर नाट्यातील चेंज मेकरची भूमिका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे शिवसेनेतील सदस्यांची ठरली. त्यामुळे ज्यांचामुळे अशक्य ते शक्य झाले. भाजपचे २० सदस्य, काँग्रेसचे ५, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४, तर ठाकरे शिवसेनेचे २, असे संख्याबळ झाल्याने सत्तांतर होण्यास मदत झाली.

Nandurbar ZP
Crop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका

राज्य व देश पातळीवरील पक्षांची भूमिका काहीही असो, मात्र स्थानिक स्तरावर सत्तेसाठी ज्या मित्र पक्षांनी पक्षाचा विरोध पत्करून साथ दिली. त्या सदस्यांचा सन्मान राखण्यास प्राधान्य भाजपचे नेते डॉ. गावित यांनी दिले. भाजपला अध्यक्षपद मिळाले, म्हणून विषय समिती सभापतिपद एक घेतले, काँग्रेसला उपाध्यक्षपद दिले, म्हणून विषय समिती सभापतिपद एक दिले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मोहन शेवाळे यांनी सव्वा वर्षाचे सभापतिपद न घेता जनतेचा कामासाठी वेळ देण्यास प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला.

त्यांचा या मोठेपणा व समजूतदारपणाचे मंत्री डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित यांनी कौतुक केले. मात्र राष्ट्रवादीचे मोहन शेवाळे यांनी दाखविलेला मोठेपणाचा लाभ ठाकरे शिवसेनेला झाला आहे.

त्यामुळे ठाकरे शिवसेनेचे आमदार आमश्‍या पाडवी यांचा मुलगा शंकर पाडवी व जिल्हाप्रमुख असलेले गणेश पराडके या दोन्ही सदस्यांचा गळ्यात सभापतिपदाची माळ पडली. इच्छुक भाजपचे सदस्य मात्र नाराज झाले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com