Palghar News: पालघर-डहाणू प्रवास खडतर
Palghar Dahanu Road Issue : पालघर आणि डहाणू तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे दुरवस्था (Damaged Road) झाली आहे. डहाणू तालुक्यातून बोईसर आणि पालघर भागात जाण्यासाठी मोगरबाव, जांबूपाडा, परनाळी रस्त्याचा वापर केला जातो.
परंतु रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या रस्त्यांची दुरुस्ती (Road Maintenance) करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
मोगरबाव-परनाळी रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुरुस्ती करण्यात आली नसल्याने रस्त्यावर खड्ड्यांची संख्या वाढली आहे. डहाणू व पालघर पंचायत समितीअंतर्गत असलेल्या बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून रस्त्यावरील खड्डे बुजविले होते.
तर काही काही ठिकाणी डांबरीकरण केले होते; पण सहा महिन्यांच्या कालावधीत रस्त्यावर पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत.
रस्त्यांची दुरवस्था झाल्याने टायर पंक्चर आणि वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना वाढल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. मोगरबाव परनाळी रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी आणि जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
परनाळी जांबूपाडा भागातील शेतकरी बोईसर, डहाणू, वाणगावसह मुंबई बाजारपेठेत आपला भाजीपाला विक्रीसाठी नेण्यासाठी परनाळी, मोगरबाव रस्त्याचा वापर करतात.
पण रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळेत भाजीपाला पोहचवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक आणि ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असल्याने वाहनचाकांना होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू केले पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरीक तुषार राऊळ यांनी केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.