Crop Damage : बाजरी, सोयाबीन पिके धोक्यात

गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मका, बाजरी, सोयाबीन, ऊस या पिकांसह फळबागा अडचणीत आल्या आहेत.
Soybean Crop Damage
Soybean Crop DamageAgrowon

पुणे : परतीच्या पावसाने जिल्‍ह्यात (Heavy Rainfall Pune) चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अनेक भागांत पावसाने ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे मका, बाजरी, सोयाबीन (Soybean Crop Damage), ऊस या पिकांसह फळबागा अडचणीत (Orchard In Crisis) आल्या आहेत.

सोमवारी (ता.१७) सकाळी आठ वाजेपर्यंत हवेलीतील कोथरूड येथे ११.८, थेऊर १३.८, उरुळीकांचन १९.५, हडपसर येथे १५.८ मिलिमीटर पाऊस पडला. तर, खेड, खडकवासला, भोसरी, चिंचवड, कळस, पुणे वेधशाळा, केशवनगर, वाघोली भागांत हलक्या सरी बरसल्या.

Soybean Crop Damage
Soybean Crop : जांभळीच्या वावरात ३०-३५ हजाराचा फटका

मुळशीतील पौड १२.३, घोटावडे १२.३, तर थेरगाव, माले, मुठे, पिरंगुट भागांत तुरळक सरी बरसल्या. भोरमधील भोर ३०.३, भोलावडे १३.५, नसरापूर १८.३, किकवी २१.५, आंबवडे १७.०, संगमनेर २३.३, निगुडघर येथे १७ मिलिमीटर पाऊस पडला. मावळमधील खडकाळा, लोणावळा, शिवणे येथे हलका पाऊस कोसळला.

Soybean Crop Damage
Soybean Crop Damage : ‘हाती येता येता झाली सोयाबीनची माती’

पुरंदरमधील सासवड ३४.५, भिवंडी १७.३, कुंभारवळण ३४.८, जेजुरी २८.५, परिंचे २३, वाल्हा येथे २५.८ मिलिमीटर पाऊस झाला. वेल्ह्यातील विंझर १०.३, आंबवणेला २१.० मिलिमीटर पाऊस पडला.

जुन्नरमधील नारायणगाव, वडगाव आनंद, बेल्हा भागांतही हलका पाऊस पडला. आंबेगावमधील घोडेगाव, आंबेगाव, कळंब, पारगाव, मंचर, तर शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ येथे पावसाच्या सरी कोसळल्या.

तसेच, बारामतीतील बारामती, माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, तर इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णे, सणसर. दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड या भागांत पावसाच्या सरी पडल्या.

सध्या जिल्ह्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण असून वातावरणात काही प्रमाणात उकाडा वाढला आहे. अधूनमधून ऊन पडत असल्याने पिके वाफसा स्थितीत येत असतानाच पुन्हा पाऊस पडत आहे. याचा फटका मका, बाजरी, सोयाबीन, ऊस या पिकांसह फळबागांना बसत आहे.

सध्या बाजरी आणि मका काढणीस तयार झाले असतानाच पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर उभ्या बाजरीला कोंब येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. उसाच्या पिकात पाणी साचून राहत असल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com