Smart Cotton Project : शेतकरी गटाने पिकविलेल्या कापसाच्या बनणार गाठी

जिल्ह्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातून विविध भागातील शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनासाठी सहभाग घेतला.
Smart Cotton Project
Smart Cotton Project Agrowon

अकोला ः स्मार्ट कॉटन प्रकल्पाअंतर्गत (Smart Cotton Project) जिल्ह्यातील मौजे दोनवाडा येथील अहिल्यादेवी होळकर कापूस उत्पादक (Cotton Producer) गटामार्फत उत्पादित कापूस जिनिंग (Cotton ginning) आणि प्रेसिंग (Cotton pressing) करण्यासाठी पाठवण्यात आला. कापसावर प्रक्रिया करून (Cotton processing) त्याच्या गाठी तयार केल्या जाणार आहेत.

जिल्ह्यात स्मार्ट कॉटन प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पातून विविध भागातील शेतकऱ्यांनी कापूस उत्पादनासाठी सहभाग घेतला.

दोनवाडा गावातील अहिल्यादेवी होळकर गटाने उत्पादित केलेला कापूस आपातापा येथील जय गुरू जिनिंग प्रेसिंग येथे गाठी तयार करण्यासाठी आणण्यात आला.

महाकॉट, पियायू व कृषी विभागाच्या सहकार्याने व्यापारी तत्त्वावर कापसाचे गाठींमध्ये मूल्यवर्धन करून थेट लाभ हस्तांतरित करीत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळावा या उद्देशाने शासनाने हा प्रकल्प सुरू केला.

दोनवाडा येथील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. सोमवारी (ता. २३) सहा शेतकऱ्यांनी सुमारे २६० क्विंटल कापूस आणला.

या वेळी प्रकल्प संचालक (आत्मा) आरिफ शाह, उपविभागीय कृषी अधिकारी के. बी. खोत, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरुणकर, जिल्हा नोडल अधिकारी मनीष मनभेकर, मंडळ कृषी अधिकारी संदीप संखे, प्रदीप राऊत, सिनिअर कॉटन ग्रेटर महाकोट एम. बनचरे, कृषी पर्यवेक्षक सी. पी. नावकार, कृषी सायक धर्मेंद्र राठोड, संतोष मुळे, संजय सावदेकर, अनिल वानखडे, नीतेश घाटोळ, प्रणीत बंड व गटातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Smart Cotton Project
Cotton, Soybean Rate : ॲग्रोवनमुळं कापूस, सोयाबीनचे भाव पडले का?
शेतकऱ्यांनी बाजारातील लांब धाग्याच्या कापूस वाणांची लागवड करीत उत्पादन घेतले आहे. या शेतकऱ्यांनी पहिल्या दोन ते तीन वेचणीचा कापूस दिला. प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात २६० क्विंटल आला आहे. आणखी काही शेतकरी येत्या काळात कापूस देणार आहेत. प्रक्रियेनंतर तयार होणाऱ्या गाठीची विक्री केली जाईल. शेतकऱ्यांना बाजार मूल्यापेक्षा अधिक दर यामुळे मिळू शकेल.
संतोष मुळे, कृषी सहायक, दोनवाडा

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com