Rice Export : तुकडा, सेंद्रिय बिगर बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवली

तुकडा तांदळाचा उद्योगही देशात खूप मोठा आहे. आता केंद्र सरकारने तुकडा तांदळासह सेंद्रिय बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मंगळवारी (ता. २९) उठवली आहे.
Rice Export
Rice ExportAgrowon


नवी दिल्ली ः तुकडा तांदळाचा (Tukada Rice) उद्योगही देशात खूप मोठा आहे. आता केंद्र सरकारने तुकडा तांदळासह सेंद्रिय बिगर बासमती (Non Basmati Rice) तांदळाच्या निर्यातीवरील बंदी मंगळवारी (ता. २९) उठवली आहे. उत्पादनात वाढ झाल्याने तुकडा तांदळाच्या किमती नरमल्यानंतर केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या पावलामुळे या वस्तूच्या निर्यातीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार आहे.

Rice Export
बिगर बासमती तांदूळ निर्यातीला सरकारी खरेदीचा फटका

सप्टेंबरमध्ये सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत उपलब्धता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने सप्टेंबरच्या सुरुवातीला तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. यानंतर बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्यात आले. किरकोळ बाजारातील किमती वाढल्यानंतर त्यांचा देशांतर्गत पुरवठा वाढवणे हा त्याचा उद्देश होता.

Rice Export
Rice export ban: तांदूळ निर्यातीवरील बंदी तातडीने मागे घ्या

डीजीएफटीने अधिसूचना जारी केली
एका अधिसूचनेत, परकीय व्यापार महासंचालनालयाने म्हटले आहे, की सेंद्रिय बिगर बासमती तांदळाची निर्यात, ज्यात सेंद्रिय बिगर बासमती तांदळाचा समावेश आहे, आता सप्टेंबरमध्ये लागू झालेल्या बंदीपूर्वीच्या नियमांनुसार नियंत्रित केली जाईल. चालू आर्थिक वर्षात एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत तांदूळ निर्यात ५.५ अब्ज डॉलर होती. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये ते ९.७ अब्ज डॉलर होते.

सरकारच्या या निर्णयाचे समर्थन
अखिल भारतीय तांदूळ निर्यातदार संघटनेचे माजी अध्यक्ष विजय सेटिया म्हणाले, की भारतातून दरवर्षी सुमारे दहा ते पंधरा हजार टन सेंद्रिय तांदूळ (बासमती आणि बिगर बासमती) निर्यात होते. गेल्या ४-५ वर्षांत सेंद्रिय बासमती आणि बिगर बासमती तांदळाची निर्यात झपाट्याने वाढत असून सरकारने बंदी उठवण्यासाठी योग्य पाऊल उचलले आहे. चीननंतर भारत हा तांदूळ उत्पादक देश आहे आणि जागतिक तांदूळ बाजारपेठेत भारताचा वाटा ४० टक्के आहे. दुसरीकडे, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एफसीआय) व्यवस्थापकीय संचालक अशोक केके मीना यांनी २३ नोव्हेंबर रोजी सांगितले होते, की सरकार नियमितपणे जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यकतेनुसार सुधारात्मक उपाययोजना करत आहे.

तुकडा तांदूळ कुठे वापरला जातो
तुकडा तांदूळ इथेनॉलनिर्मिती उद्योगात तसेच पोल्ट्री आणि प्राणी उद्योगात वापरला जातो, तर वाईन बनवण्याच्या उद्योगालाही तुकडा तांदळाची गरज असते.
Remarks :

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com