Banana Rate
Banana RateAgrowon

Banana Rate : खानदेशात केळी दर स्थिर

खानदेशात केळीचे दर स्थिर असून, कमाल दर किंवा निर्यातीच्या केळीचे दर ३००० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. केळीची आवक कमीच आहे.

Banana Market जळगाव ः खानदेशात केळीचे दर (Banana Rate) स्थिर असून, कमाल दर किंवा निर्यातीच्या केळीचे दर (Exportable Banana) ३००० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर आहेत. केळीची आवक (Banana Arrival) कमीच आहे.

सध्या केळीला किमान २००० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे. केळीची आवकही कमीच असून, प्रतिदिन ६० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे.

धुळ्यातील शिरपूर, जळगावमधील चोपडा, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागातून काही शेतकऱ्यांच्या दर्जेदार केळीची पाठवणूक कंपन्या किंवा खरेदीदार उत्तर भारत, परदेशात करीत आहेत.

परदेशात सध्या रोज तीन कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची पाठवणूक होत आहे. या केळीला कमाल ३००० रुपये प्रति क्विंटलचा दर आहे.

Banana Rate
Banana Export : केळी लागवड, निर्यातीत सोलापूरचा टक्का वाढला

थंडी लांबल्याने केळी काढणीवर हवी तशी आलेली नाहीत. अनेकांचे केळी पीक कुकुंबर मोझॅक विषाणूने खराब झाले होते.

Banana Rate
Banana Board : केळी महामंडळाचा प्रश्न रेंगाळलेलाच

नांग्या भराव्या लागल्या, पिकात तूट आली, यामुळे केळी काढणीवर येण्यास विलंब लागत आहे. परिणामी, केळीची आवक कमी असून कमाल दर ३००० रुपये प्रति क्विंटलवर आहेत.

देशात केळीला चांगली मागणी आहे. कमी दर्जाच्या केळीचीही आवक काही भागात होत आहे. पण या केळी पिकातूनही हवी तशी काढणी सध्या होत नसल्याची स्थिती आहे.

मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथेही केळीची आवक सध्या प्रतिदिन ५० ते ५५ ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) होत आहे.

या केळीला उठाव आहे. जळगाव जिल्ह्यातील जळगाव, जामनेर, पाचोरा-भडगाव या भागात केळीची कुठलीही आवक सध्या होत नसल्याची स्थिती आहे.

फक्त रावेर, मुक्ताईनगर व यावल भागात आवक होत आहे. नंदुरबारमधील शहादा व तळोदा भागातही आवक अल्पच आहे. धुळ्यातील शिरपुरात आवक बरी आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com