Agriculture Loan : कृषिपूरक उद्योगांना कर्ज देण्यास बँका उदासीन

शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव बँका नाकारत आहेत. बँकांच्या उदासीनतेमुळे या घटकांसाठी जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजनेत ठेवलेली उद्दिष्टे कागदावरच आहेत.
Agriculture Credit
Agriculture CreditAgrowon

परभणी ः जिल्ह्यात कृषिपूरक, प्रक्रिया उद्योग तसेच कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी इच्छुक शेतकऱ्यांना बँकांकडून मुदत कर्जांची (Term Loan) गरज आहे. परंतु बँका कर्ज (Agriculture Loan) मंजुरीसाठी जाचक अटी लावत आहेत. परिणामी, कृषी विभागाच्या विविध योजनांतर्गत (Agriculture Scheme) शेतकऱ्यांचे कर्ज प्रस्ताव बँका नाकारत आहेत. बँकांच्या उदासीनतेमुळे या घटकांसाठी जिल्हा वार्षिक पतपुरवठा (Loan Supply) योजनेत ठेवलेली उद्दिष्टे कागदावरच आहेत. विविध योजनांच्या अनुदानाच्या लाभाअभावी शेतकरी अडचणीत आले आहेत.

Agriculture Credit
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठा ६१ टक्क्यांवर

जिल्हा वार्षिक पतपुरवठा योजनेत दरवर्षी पीककर्ज तसेच मध्यम मुदतीचे कृषिकर्ज, पायाभूत सुविधा यासाठी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात येते. यंदाच्या (२०२२-२३) आर्थिक वर्षात जिल्ह्यात कृषी यांत्रिकीकरणासाठी १३३ कोटी ६१ लाख रुपये, फळबाग लागवडीसाठी ५५ कोटी ६० लाख रुपये, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसायासाठी ७६ कोटी २७ लाख रुपये, कुक्कुटपालनासाठी ३५ कोटी ३७ लाख रुपये, शेळी ,मेंढी, वराह पालनासाठी २० कोटी ९३ लाख रुपये, मत्स्य व्यवसायासाठी २ कोटी ७८ लाख रुपये एकूण ४३७ कोटी ५६ लाख ७९ हजार रुपये उद्दिष्ट आहे.

Agriculture Credit
Crop Loan : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बॅंक आघाडीवर

गोदाम, कोल्ड स्टोअरेज आदी कृषी पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी ११० कोटी ७९ लाख ७ हजार रुपये, अन्न प्रक्रिया आणि कृषी प्रक्रिया उद्योगासाठी २११ कोटी ७५ लाख रुपये, सूक्ष्म, लघू आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगासाठी १ हजार ४९ कोटी १५ लाख रुपये उद्दिष्ट आहे. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील ‘एक जिल्हा एक उत्पादन’अंतर्गत जिल्ह्यात गूळ उद्योगासाठी शेतकऱ्यांनी बँकांकडे कर्ज प्रस्ताव सादर केले. परंतु केवळ दोनच प्रस्ताव मंजूर केले आहेत.

‘पोकरा’अंतर्गत शेटनेट, पॉलिहाउस उभारणीसाठी ३४ कर्ज प्रस्ताव सादर केले. त्यापैकी केवळ एका प्रस्तावास ८९ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आदीचे असंख्य कर्ज प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत आहेत. कर्जवसुलीसाठी सुरक्षितता म्हणून शहरी भागातील (अकृषिक) मालमत्ता तारण ठेवण्याची अट शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या तसेच ग्रामीण भागातच उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या बहुतांश शेतकऱ्यांच्या शहरी भागात मालमत्ता नाहीत. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्ज मिळणे अशक्य झाले आहे.

कृषी मुदत कर्ज उद्दिष्ट, साध्य स्थिती (रक्कम कोटींत)

वर्षे...उद्दिष्ट...साध्य...टक्केवारी

२०१८-२९...४६०.०२...३२८.७७...७१.४६

२०१९-२०...७२४.८३...५८.६८...८.०९

२०२०-२१...८५०.३९...६९.९२...८.२२

शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे ग्रामीण भागात कृषी पूरक, प्रक्रिया उद्योगासाठी खेळते भांडवल म्हणून कर्जाची गरज आहे. सुरक्षिततेसाठी बँकांनी शहरी मालमत्ता तारण ठेवण्याची अट घातली आहे. शहरात मालमत्ता नसल्यामुळे कर्ज मिळत नाही.

शेती तसेच गावातील घर या मालमत्ता तारण ठेवून कर्जपुरवठा करावा.

- एकनाथ साळवे, शेतकरी, सिंगणापूर, जि. परभणी

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत बँकांकडे शेतकऱ्यांनी दाखल केलेले ६६ पैकी २ कर्ज प्रस्ताव मंजूर केले आहेत.

बँकांकडून अर्थसाह्य मिळत नसल्याने इच्छा असूनही शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग सुरू करता येत नाहीत.

- बी. एस. कच्छवे,

जिल्हा कृषी उपसंचालक, परभणी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com