बँकांना मदतनिधीतून कर्जकपात करता येणार नाही

सहकार विभागाने काढला आदेश; शेतकऱ्यांना दिलासा
Banks cannot deduct loans from relief funds
Banks cannot deduct loans from relief fundsAgrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

मुंबई : राज्यात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे २०२० मध्ये झालेल्या गारपीट आणि अवेळी पावसामुळे नुकसानीपोटी मिळालेल्या मदतीतून शेतकऱ्यांचे कर्ज आणि अन्य गोष्टींसाठी कपात करण्यास मनाई करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकतीच ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली होती.

Banks cannot deduct loans from relief funds
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

२०२० मध्ये फेब्रुवारीपासून मे महिन्यांपर्यंत गारपीट आणि अवकाळी पाऊस झाला होता. या आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. नुकतेच शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर २०२१ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरसदृश परिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीपोटी ८५७ कोटी सात लाख १७ हजार रुपयांची निधी कोकण, नागपूर, अमरावती आणि औरंगाबाद विभागांना वाटप करण्यात आला आहे. या निधीपैकी ५१५ कोटी तीन लाख ५५ हजार रुपयांचा निधी तांत्रिक कारणांमुळे वितरित करण्यात आलेला नाही.

Banks cannot deduct loans from relief funds
Kharif Crop Damage : खरिपाचे नुकसान; रब्बी हंगामही अडचणीत

मात्र, नुकसानीपोटी जितकी मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. ही रक्कम काही बँका पीक कर्ज किंवा अन्य कर्जांच्या कारणास्तव वळती करून घेत होते. मात्र, सहकार विभागाने याबाबत आदेश काढून मदतीच्या बँकेतील खात्यावरील रकमेतून कुठल्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेश काढले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com