APMC Election : बाजार समित्यांच्या निवडणुकीचा धुरळा

खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारातील सर्वच बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. शासनाने आदेश जारी केल्याने सुमारे दीड वर्षे रखडलेल्या निवडणुका पार पडतील.
APMC Election
APMC ElectionAgrowon

जळगाव ः खानदेशात जळगाव, धुळे व नंदुरबारातील सर्वच बाजार समित्यांची निवडणूक (APMC Election) होणार आहे. शासनाने आदेश जारी केल्याने सुमारे दीड वर्षे रखडलेल्या निवडणुका पार पडतील. यातच शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार (Voting Right To Farmer) असल्याने निवडणुकीत रंग भरेल, चुरस वाढेल, असेही दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात जळगाव, चोपडा, भुसावळ, मुक्ताईनगर, यावल, रावेर, जामनेर, अमळनेर, पारोळा, पाचोरा, धरणगाव, धुळे जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिरपूर आणि दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील बाजार समित्यांचाही निवडणूक प्रक्रियेत सहभाग आहे. तसेच नंदुरबारातील नंदुरबार, शहादा, तळोदा, नवापूर या बाजार समित्यांतही निवडणूक होईल.

APMC Election
APMC Election : मतदानाबाबत शेतकरी संभ्रमात

बाजार समित्यांवर काही महिन्यांपासून प्रशासक मंडळाची नियुक्ती झाली होती. अनेक बाजार समित्यांत सर्व पक्षीय पॅनेल सत्तेत होते. तर काही भागांत दोन्ही काँग्रेसचे वर्चस्व होते. मध्यंतरी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासक मंडळावर वर्णी लावून घेतली होती. पण निवडणूक जाहीर झाल्याने बाजार समित्यांसाठी चुरशीच्या लढती होतील. कारण शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार आहे. उमेदवारांना यापूर्वी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या व ग्रामपंचायतींच्या सदस्यांचे मतदान मिळवावे लागत होते. परंतु आता सोसायट्या व पंचायतींसोबत शेतकऱ्यांचेही मतदान मिळवावे लागेल. यामुळे घरोघरी संपर्क वाढवावा लागेल. विधानसभेच्या निवडणुकीचे स्वरूपच जणू या निवडणुकीला येईल, असे दिसत आहे. यातच मतदारांची संख्या वाढल्याने अनेक प्रस्थापित उमेदवार, नेत्यांची सद्दीही संपुष्टात येईल.

आजी-माजी संचालक लागले तयारीला...

बाजार समितीच्या निवडणुका जाहीर झाल्याने आजी माजी संचालक तयारी करू लागले आहेत. आता थेट शेतकऱ्यांमध्ये जावे लागणार असल्याने शेतकऱ्यांशी संपर्क वाढविण्याचा कार्यक्रम अनेकांनी आखला आहे. पीकविमा, पीक नोंदणी, खराब शेतरस्ते, पंचनामे, पिकांवरील रोगराई याबाबत इच्छुक मंडळी अजेंडा हाती घेऊन कामाला लागल्याचे चित्र

बाजार समितीत कोविड काळात निवडणूक प्रक्रिया स्थगित होती. आता निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकरी नेते, कार्यकर्ते यांच्यात उत्साह आहे. यंदा खातेदार शेतकरी मतदान करू शकतील. यामुळे प्रचार, विषय यात व्यापकता येईल. शेतकरी आपला प्रतिनिधी निवडून देतील. याचाही आनंद आहे. पण बाजार स्वातंत्र्य, खुला बाजार यांवरही काम व्हावे. शेतकरी बाजार समितीच्या जोखडातून बाहेर कसा येईल याचाही विचार व्हावा.
किरण पाटील, शेतकरी नेते, जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com