Soybean Seeds
Soybean SeedsAgrowon

Soybean Rate : काढणीपश्‍चात सोयाबीन बियाणे साठवणुकीची काळजी घ्या

पुढील खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी या वर्षी खरिपामध्ये व्यापक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे मोहीम राबविण्यात आली.

बुलडाणा : पुढील खरीप हंगामात सोयाबीन बियाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी या वर्षी खरिपामध्ये व्यापक प्रमाणात घरचे सोयाबीन बियाणे (Soybean Seed ) मोहीम राबविण्यात आली. सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झालेला असल्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीपश्‍चात सोयाबीनच्या बियाण्यांची योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

या वर्षी खरीप हंगामात सोयाबीन काढणीवेळी झालेल्या पावसामुळे सोयाबीन बियाणे उत्पादन व गुणवत्‍तेवर परिणाम झाला. त्यामुळे आगामी खरीप हंगामामध्ये सार्वजनिक, खासगी क्षेत्रामार्फत बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध होणाऱ्या प्रमाणित सोयाबीन बियाण्याचे प्रमाण कमी असणार आहे. त्यासाठी उत्पादित सोयाबीन बियाण्याची योग्य पद्धतीने साठवणूक करणे आवश्यक आहे. जेणेकरून सदर बियाणे खरिपात पेरणीसाठी उपलब्ध होईल.

Soybean Seeds
Soybean Procurement : बियाणे कंपन्यांची बाजार समित्यांमध्ये सोयाबीन खरेदी

त्यासाठी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांमध्ये सोयाबीन कापणीनंतर बियाणे साठवणूक आणि काळजीबाबत जागृती आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीनची कापणीपश्‍चात काळजी घ्यावी. यासाठी सोयाबीन बियाणे वाळवताना त्याचा मोठा ढीग करू नये. बियाणे पातळ थरावर वाळवावे. ज्यामुळे बियाण्यामध्ये असलेल्या आर्द्रतेमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.

बियाणे मळणी केल्यानंतर थेट पोत्यामध्ये भरू नये. तत्पूर्वी दोन ते तीन दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळे तयार करून सावलीमध्ये वाळवावे. यादरम्यान बियाण्यावर हात फिरवून फेरपालट करावी. बियाणे वाळल्यानंतर बियाणे चाळणीद्वारे गाळणी करून बियाण्यात काडीकचरा आणि मातीचे खडे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्यूटच्या बारदानामध्ये भरावे.

Soybean Seeds
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

पोत्यामध्ये साधारणपणे ६० किलोपर्यत बियाणे साठवावे. बियाणे घरी साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्यांची थप्पी ७ पोत्यापेक्षा उंच जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करू नये. बियाणे साठवणूक करण्यापूर्वी जमिनीवर तट्टे किंवा लाकडी फळ्या किंवा जुने पोते अंथरूण त्यावर बियाण्याची साठवण करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

कमीत कमी हाताळणी करावी

बियाण्यांचे पोते सीलिंग करण्यापूर्वी बियाण्याची प्रत चांगली असल्याची खात्री करा.

प्रत्येक पोते तपासणी करून ज्या पोत्यामध्ये काडीकचरा, दगडमाती, काळपट व ओलसर बियाणे आढळून आल्यास त्या पोत्याचे सीलिंग करू नये.

बीजोत्पादनासाठी उत्पादित केलेले प्रमाणित व पायाभूत बियाणे पूर्णपणे उत्पादकांचे शेतावर मळणी झाल्यानंतर व वाळविल्यानंतर गुणवत्तापूर्ण बियाण्याची गोदामामध्ये साठवणूक करावी.

शेतकऱ्यांनी स्वत:कडील सोयाबीनची ३ वेळा उगवणक्षमता चाचणी करूनच पेरणी करावी. सोयाबीन बियाण्याचे कवच नाजूक असल्यामुळे त्याची कमीत कमी हाताळणी करा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com