
Pune News ओतूर, ता. जुन्नर ः येथील अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात गुरुवार (ता.१६) आणि शुक्रवार (ता.१७) अशा दोन दिवशी मोफत मधमाशी पालन (Beekeeping) कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
कार्यशाळेत मधमाशीचे शेतीमधील महत्त्व, प्रकार, पोळ्याची रचना, फुलांच्या झाडांची लागवड, पालनासाठी योग्य अवजारे, कीड-रोग व त्याचे नियंत्रण, मधमाशीपासून मिळणारे विविध पदार्थ, विविध हंगामात पेटीची काळजी,
मधाचे व विविध प्रॉडक्ट्सचे फायदे, भारतातील आणि परदेशातील मधमाशीपालनामधील फरक, स्वतः मधमाशीच्या पेटीची हाताळणी व त्यांचे निरीक्षण, सरकारच्या मधमाशी पालनासंदर्भात योजना, असे विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रशिक्षण देण्यासाठी पुणे येथील केंद्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण व संशोधन संस्थेचे मास्टर ट्रेनर प्रा. हेमंतकुमार डुंबरे उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केले आहे. सर्वांनी सहभागी होण्यासाठी अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयात अथवा प्रा. डॉ. व्ही. डी. जाधव, मोबा नंबर ः ९८९०२२९०३७ यांच्याशी संपर्क साधावा.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.