
Sudhir Mungatiwar चंद्रपूर : सांस्कृतिक विभागाच्या (Department Of Cultiure) पुढाकाराने कविवर्य राजा बढेलिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा’ (Maharashtra Geet) या गिताला राज्यगीताचा दर्जा देण्यात आला.
त्याची अंमलबजावणी शिवजयंतीपासून करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला. त्यानुसार या राज्यगीताचा प्रारंभ चंद्रपूर नगरीतून होत असल्याचा आपल्याला मनस्वी आनंद होत आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सांगितले.
सांस्कृतिक विभागाच्या पुढाकाराने महाराष्ट्राच्या राज्यगीताचा अधिकृत प्रारंभ झाला, असे घोषित करून मुनगंटीवार म्हणाले, ‘‘सामान्य प्रशासन विभागाच्या १ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयान्वये, महाराष्ट्राच्या राज्यगीताची घोषणा करण्यात आली आहे.
शिवजयंती हा केवळ एक उत्सव नव्हे तर छत्रपतींच्या ३५० व्या राज्यभिषेकाच्या पर्वावर रयतेचे राज्य आणण्यासाठी संकल्प करण्याचा हा दिवस आहे. या राज्यगीताचा प्रत्येक शब्द पराक्रम जागवतो, गीतामधून विरतेचा मंत्र दिसतो.’’
मुनगंटीवार म्हणाले,‘‘‘चांदा पासून बांदा’ पर्यंत आणि ‘भामरागड पासून रायगडपर्यंत’ छत्रपतींच्या राज्यभिषेकाचे ३५० वे वर्ष संपूर्ण राज्यभर अतिशय उत्साहात साजरे करण्याचा आपला संकल्प आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय संग्रहालय आपण तयार करीत आहोत. शिवसाहित्य संमेलन, शिवगीत स्पर्धा लवकरच सुरू करण्यात येतील.’’ डॉ. मंगेश गुलवाडे म्हणाले, ‘‘राज्यगीताची सहा दशकाची मागणी आज पूर्णत्वास आली आहे. शिवजयंतीच्या पर्वावर राज्यगीताचे गायन सर्व शासकीय कार्यक्रमात आता होईल.’’
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.